सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, मात्र चांदीची चमक कायम; पाहा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरांतील आजचे

मुंबई : सोने-चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज चांगली संधी आहे. आज (९ मे) रोजी देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात किंचित (Gold-Silver Price Today) नरमाई दिसून आली आहे, तर चांदीचे दर मात्र सातत्याने वाढताना दिसत आहेत. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या किमतीतील वाढ सध्या थांबलेली दिसत आहे. शनिवारी सकाळी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे (Gold-Silver Price Today) दर किंचित कमी झाले आहेत. मात्र, चेन्नईमध्ये सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे.(Gold-Silver Price Today)

राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार ८७० रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार ६७० रुपयांना विकले जात आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण झाली होती आणि दर १ लाख ५५ हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला होता.(Gold-Silver Price Today)

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सध्या जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा दर ४,७२१ डॉलर प्रति औंस इतका आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे.(Gold-Silver Price Today)

Gold-Silver Price Today: प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे दर

दिल्ली
२२ कॅरेट : १,४०,०९० रुपये
२४ कॅरेट : १,५२,८७० रुपये

मुंबई
२२ कॅरेट : १,३९,९४० रुपये
२४ कॅरेट : १,५२,६७० रुपये

अहमदाबाद
२२ कॅरेट : १,३९,९४० रुपये
२४ कॅरेट : १,५२,७२० रुपये

चेन्नई
२२ कॅरेट : १,४१,०३० रुपये
२४ कॅरेट : १,५३,८५० रुपये

कोलकाता
२२ कॅरेट : १,३९,९४० रुपये
२४ कॅरेट : १,५२,६७० रुपये

हैदराबाद
२२ कॅरेट : १,३९,९४० रुपये
२४ कॅरेट : १,५२,६७० रुपये

जयपूर –
२२ कॅरेट १,४०,०९० रुपये
२४ कॅरेट : १,५२,८७० रुपये

भोपाळ
२२ कॅरेट : १,३९,९४० रुपये
२४ कॅरेट : १,५२,७२० रुपये

लखनौ
२२ कॅरेट : १,४०,०९० रुपये
२४ कॅरेट : १,५२,८७० रुपये

चंदीगड
२२ कॅरेट : १,४०,०९० रुपये
२४ कॅरेट : १,५२,८७० रुपये

दरम्यान, चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ९ मे रोजी सकाळी चांदीचा दर प्रति किलो २ लाख ७५ हजार १०० रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर ८१.१४ डॉलर प्रति औंस इतका नोंदवण्यात आला आहे.
एक दिवस आधी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात २०० रुपयांची घसरण होऊन तो २ लाख ६१ हजार ३०० रुपये प्रति किलोवर आला होता. मात्र, आता पुन्हा चांदीच्या किमतीत तेजी दिसून येत आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.