IPL 2026 – क्रिकेट नाही हा तर तमाशा आहे, हर्ष गोयंका यांनी उपस्थित केले आयपीएलवर प्रश्न

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

IPL चा 19 वा हंगाम सध्या सुरू असून निम्म्याहून अधिक सामने पूर्ण झाले आहेत. मात्र, यंदा आयपीएलला चाहत्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आयपीएलच्या घसरत्या लोकप्रियतेकडे लक्ष वेधले आहे. यंदा टीव्हीवरील आयपीएल व्ह्यूअरशिपमध्ये 26 टक्क्यांची घट झाल्याचं सुद्धा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हर्ष गोयंका यांनी या घसरणीसाठी खेळातील असंतुलन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, आयपीएल ही आता केवळ ‘फलंदाजीचा तमाशा’ बनली असून गोलंदाजांसाठी यात काहीच उरलेले नाही. दररोज होणारे 225 हून अधिक धावांचे सामने क्रिकेटमधील थरार कमी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. बीसीसीआयने यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सुचवले आहे.

या समस्येवर उपाय म्हणून गोयंका यांनी काही सूचना मांडल्या आहेत. यामध्ये खेळपट्ट्या संतुलित करणे, ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमाचा पुनर्विचार करणे आणि स्टेडियममधील सोयीसुविधांमध्ये (स्वच्छतागृह, बसण्याची सोय, अन्न) सुधारणा करणे यांचा समावेश आहे. क्रिकेटमधील अनिश्चितता टिकवण्यासाठी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता बीसीसीआय यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.