अक्षर पटेलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह, दिल्ली कॅपिटल्सला नव्या कर्णधाराची आवश्यकता! केएल राहुल योग्य पर्याय?

दिल्ली कॅपिटल्सची आयपीएलच्या आपल्या पहिल्या विजेतपदाची प्रतीक्षा लांबली आहे. त्यांना आता पुढच्या हंगामापर्यंत वाट पाहावी लागणार आहे, कारण आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ्सच्या शर्यतीतून डीसी जवळपास बाहेर झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यातील केवळ चारच सामने संघाला जिंकता आले. त्यांनी सात सामने गमावले असून तीन सामने खेळण्याचे बाकी आहेत. हे तीन सामने त्यांनी जिंकले तर त्यांचे १४ पॉइंट्स होतील. आताच्या हंगामात १४ अंकासह प्लेऑफसाठी पात्र होणे कठीण आहे.

दिल्लीच्या या निराशाजनक कमागिरीमुळे सर्वाधिक टिका कर्णधार अक्षर पटेलवर होत आहे. त्याचे या हंगामात कर्णधार म्हणून वाईट प्रदर्शन झाले असून तो धावा करण्यात आणि विकेट्स घेण्यातही अधिक यशस्वी ठरला नाही.
अक्षरच्या गोलंदाजीची कामगिरी पाहिली तर त्याने आतापर्यंत आयपीएल १९ च्या हंगामात ११ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत. काही सामन्यांमध्ये तर त्याने ४ षटकेही पूर्ण टाकलेली नाहीत. तो टी२० क्रिकेटमध्ये अनेकदा पॉवरप्लेमध्ये षटके टाकत फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्यात पटाईत आहे, मात्र यंदाच्या आयपीएल हंगामात तसे झाले नाही. फलंदाजीमध्ये त्याची कामगिरी पाहिली तर त्याने ५० धावांचा आकडाही पार केला नाही. या हंगामात त्याने ६.२९ च्या सरासरीने ४४ धावा केल्या आहेत.

कर्णधार म्हणूनही अक्षर अपयशी ठरला आहे. त्याने अनेकदा फलंदाजांचा योग्य वापर केला नाही. आशुतोष शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर हे आळीपाळीने येताना दिसले. क्षेत्ररक्षणातही त्याने काही उत्तम निर्णय घेतले नाहीत. यावरून पुढील हंगामात दिल्लीचा कर्णधार बदलण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोणते पर्याय आहेत, ते जाणून घेऊ.

दिल्लीच्या नेतृत्वापदासाठी केएल राहुल चांगला पर्याय आहे. त्याने पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वादरम्यान लखनऊ सुपर जायंट्स २०२३ च्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचली होती. त्याने वरच्या फळीत चांगली कामगिरी केली असून त्याचा स्ट्राईक रेटही दमदार राहिला आहे.

अशा स्थितीत पुढील हंगामात राहुलला नेतृत्वाची जबाबदारी मिळणार का? तो संघाला पहिले विजेतेपद जिंकून देत संघाचा तारणहार ठरले का?

Comments are closed.