निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?

संभाजीनगर: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर काही दिवसांतच कॉर्पोरेट कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरण समोर आलं होतं. नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी मतीन पटेल यांच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय. त्यावरून सध्या राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधाऱ्यांनी एमआयएमवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर एमआयएमच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेत मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलं. दरम्यान, पोलिसांनी (Police) आज निदा खान, तिच्या आईसह नातेवाईकांची कसून चौकशी केली.

निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची पोलिसांकडून आजची चौकशी पूर्ण झाली आहे, निदा खानच्या कुटुंबाला चौकशीनंतर सोडून देण्यात आले. जवळपास दीड तास आजची चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे, निदा आणि तिच्या आईला समोरासमोर बसवून ही चौकशी करण्यात आली. निदा खानची आई, वडील, भाऊ आणि मावशीची करण्यात चौकशी करण्यात आली असून गरज पडल्यास आणखी चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी आजच्या चौकशीत निदा खान फरार असताना कुठे होती, का फरार झाली, या अनुषंगाने चौकशी केली. निदा फरार का होती?, कोणाच्या संपर्कात होती, मावशीसोबत कुठे कुठे होती? याबाबत विचारणा केल्याची सूत्रांची माहिती आहे.

मतिनला महापालिकेकडून नोटीस

दरम्यान, निदा खानला लपवलेल्या घराचे मालक हनीफ खान युसुफ खान यांच्याकडून नगरसेवक मतीनने दोन महिन्यापूर्वी घर खरेदी केल्याचा आरोप आहे. तर, ज्या ठिकाणी निदा खानला लपवले होते, त्याच ठिकाणी मतीनचे ऑफिस आहे. या दोन्ही ठिकाणी महापालिकेने नोटीस बजावली असून त्याच्या घरावरही नोटीस चिकटवण्यात आली आहे. या नोटीसीत बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगत तीन दिवसात आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.

असदुद्दीन ओवैसींकडून निदाची पाठराखण

याप्रकरणी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, टीसीएसचे स्टेटमेंट आपण पाहिले असेल. निदा खानचा एचआरशी कोणताही संबंध नव्हता. एफआयआर होण्यापूर्वी निदा खानची बदली झाली होती. काही लोक मीडिया ट्रायल करत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. बुरखा घालणं कधीपासून बेकायदेशीर झालं? आमचा न्यायालयावर विश्वास आहे. निदा खानवरील आरोप टिकणार नाहीत. केवळ द्वेषापोटी आरोप केले जात आहेत. आरोप झाले म्हणजे शिक्षा झाली असं नाही. एमआयएमला टार्गेट करा, काहीही फरक पडत नाही, असे ओवैसी यांनी म्हटले.

हेही वाचा

लवांडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर..; रोहित पवार थेट पोलीस ठाण्यात, शाईफेकीच्या घटनेवरुन आमदारांचा इशारा

आणखी वाचा

Comments are closed.