GT vs RR: जोफ्रा आर्चरनेकडून नो-बॉल आणि वाईडचा पाऊस! आयपीएलच्या इतिहासात नोंदवला नकोसा विक्रम
इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 52 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांच्यासाठी सुरुवातीचा काळ एखाद्या भयानक स्वप्नासारखा ठरला.
राजस्थान रॉयल्सकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) नो-बॉल आणि वाईड चेंडूंचा असा पाऊस पाडला की त्याने आपल्या पहिल्या षटकात एकूण 11 चेंडू फेकले. यासह त्याने असा एक विक्रम आपल्या नावावर केला जो कोणत्याही गोलंदाजाला कधीही करायला आवडणार नाही. आयपीएलच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्याच षटकात 11 चेंडू फेकणारा जोफ्रा आर्चर हा पहिला खेळाडू बनला आहे. तसेच आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक चेंडू फेकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता इतर सहा खेळाडूंसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या षटकात आर्चरने 4 वाईड आणि 1 नो-बॉल टाकला. या एका षटकात त्याने एकूण 18 धावा दिल्या.
आयपीएलमध्ये एका षटकात सर्वाधिक (11) चेंडू फेकणारे गोलंदाज!
मोहम्मद सिराज मुंबई इंडियन्स २०२३-१९वा
तुषार देशपांडे लखनौ सुपर जायंट्स- 2023 4 था
शार्दुल ठाकूर कोलकाता नाईट रायडर्स-2025 13 वे
संदीप शर्मा दिल्ली कॅपिटल्स 2025-20 वे
हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स 2025-8 वे
अर्शदीप सिंग गुजरात टायटन्स 2026-20 वे
जोफ्रा आर्चर गुजरात टायटन्स 2026 पहिले
जोफ्रा आर्चरसाठी हे षटक खराब ठरले असले तरी, आयपीएलच्या 19 व्या हंगामात त्याने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने या सीजनमध्ये आतापर्यंत एकूण 15 विकेट्स (Wickets) घेतल्या आहेत. गुजरातविरुद्धचा हा सामना त्याच्यासाठी वैयक्तिकरित्या थोडा निराशाजनक ठरला असला तरी तो या हंगामात राजस्थानचा मुख्य गोलंदाज राहिला आहे.
Comments are closed.