धक्कादायक! अमरावतीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, घटनास्थळी फॉरेसिकची टीम दाखल

अमरावती बातम्या : अमरावती जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. शिरजगाव कसबापासून जवळ असणाऱ्या पाळा या गावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. सदर मृतदेह किती महिने जुना आहे, याबद्दल कोणतेही प्रकारची माहिती अद्याप कळालेली नाही. घटनास्थळी फॉरेसिकची टीम याशिवाय वरिष्ठ स्तरातील पोलीस कर्मचारी यांनी भेटी दिल्या आहेत. ही व्यक्ती कोण आहे ओळखू येत नसल्याची माहिती आहे. शिराजगाव कसबा पोलीस अधिकचा तपास करत आहे.

अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबापासून जवळ असणाऱ्या पाळा गावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी फॉरेसिकची टीम दाखल झाली असून तपास सुरु करण्यात आला आहे.

यवतमाळच्या नेर तालुक्यात सहा वर्षीय चिमुकलीटा संशयास्पद मृत्यू, तपासासाठी पुरलेला मृतदेह काढला बाहेर

यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर राहणाऱ्या सहा वर्षीय चिमुकली अनवी घोसले हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले. 1 मे ला पाण्यासाठी गेली असता अचानक चक्कर येऊन तिचा मृत्यू झाला होता. यावेळी कोणताही वैद्यकीय तपास न करता मृतदेह घाईघाईने पुरण्यात आल्याने परिसरात उष्माघाताने की पाणीटंचाईने तिचा मृत्यू झाला असे संशयाचे वातावरण होते. अखेर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढून घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्यामुळे शव विच्छेदन हवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनवीच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी  प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीत स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जागेवरच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. संपूर्ण कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. यावेळी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, पोलीस निरीक्षक अनिल बेहेराणी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक भोयर, पोलीस उपनिरीक्षक दीपक बदरके, मंडळ अधिकारी रुपेश थोडगे तसेच तलाठी अतुल शिरभाते उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक भोयर यांनी सांगितले की, अनवी घोसले हिच्या मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील जुन्या दुहेरी खून प्रकरणातील 3 आरोपींना अटक

सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत मुख्य ३ आरोपींना अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, परभणी जिंतूर महामार्गावर सापडला मृतदेह, पोलीस दलात खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.