Italian open 2026- जोकोविच सलामीलाच गारद!
सहा वेळचा इटालियन ओपन विजेता नोव्हाक जोकोविचला इटालियन ओपन स्पर्धेत मोठा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत ७९व्या स्थानावर असलेल्या डारियो प्रिजमिक याने शानदार पुनरागमन करत जोकोविचचा २-६, ६-२, ६-४ असा पराभव केला आणि स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. पहिला सेट गमावल्यानंतर प्रिजमिकने दमदार खेळ उंचावत पुढील दोन्ही सेट जिंकले. इटालियन ओपनमध्ये जोकोविचच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला सुरुवातीच्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
Comments are closed.