पुण्यातील नांदेड सिटीत सुनेला संपवलं, नंतर घराला कुलूप लावून सासरा पसार; जळगाव पोलिसांनी अशा आव

जळगाव क्राईम न्यूज : पुणे (Pune) शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटी (Nanded City) परिसरात सुनेला संपवून फरार झालेल्या सासर्‍याला जळगाव (Jalgaon) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शिताफीने अटक केली आहे. भानुदास भास्कर चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

Jalgaon Crime News: नेमकी घटना काय?

पुण्यातील नांदेड सिटी परिसरात 2 मे रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. घरगुती कारणावरून झालेल्या वादातून आरोपी सासरा भानुदास चौधरी याने आपली सून स्वाती तेजस चौधरी हिच्या डोक्यात वार करून तिला संपवले होते. यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो तेथून पसार झाला. याप्रकरणी पुण्यातील हवेली पोलीस ठाण्यात (नांदेड सिटी चौकी) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Jalgaon Crime News: जळगावात सापळा रचून अटक

पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत असतानाच, तो जळगाव शहरातील मेहरूण गाव परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मिळाली. एलसीबीचे पथक तातडीने कार्यान्वित झाले आणि त्यांनी मेहरूण परिसरातील महादेव मंदिर परिसरात सापळा रचला आणि पोलिसांनी त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

Jalgaon Crime News: आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात

अटक करण्यात आलेला आरोपी भानुदास चौधरी याला प्राथमिक चौकशीनंतर पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आठ दिवसांपासून फरार असलेला आरोपी सापडल्याने या प्रकरणाचा पुढील तपास आता वेग घेणार आहे. कौटुंबिक वादातून एका सासऱ्याने सुनेचा जीव घेतल्याने पुण्यातील नांदेड सिटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात एसआयटीने चौकशीला बोलावलं, रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Nashik Crime News: किरकोळ वादातून सलून व्यावसायिकाला संपवलं, बुटात लपवलेला चाकू काढला अन्…; आरोपी ‘लिफ्ट’ घेऊन पसार, नाशिक हादरलं!

आणखी वाचा

Comments are closed.