हे तर फक्त छोटे मासे, खरात प्रकरणातून नाव बाहेर काढण्यासाठी आर्थिक रॅकेट; रोहित पवार यांचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भोंदी अशोक खरात प्रकरणी फक्त छोटे मासे बाहेर आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच खरात प्रकरणात आपले नाव काढून टाकण्यासाठी आर्थिक रॅकेट असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, भोंदू खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले असून त्या प्रकरणातील 1% सत्य देखील समोर आलेले नाही. समोर जे काही आले आहे ते केवळ छोटे मासे आहेत .

यामध्ये अनेक मोठे मासे देखील असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंद होणार आहे. या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजत आहे. मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे. ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितले जाते आणि या प्रकरणातून बाहेर काढले जाते अशी ही पद्धती असल्याची माहिती आहे. या माहितीची शहानिशा करून गृहमंत्री महोदयांनी योग्य ती कारवाई करावी,अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

Comments are closed.