रेलिंगला धरलं, बराच वेळ मदतीसाठी आरडाओरड; हात निसटला अन् ती थेट आठव्या मजल्यावरून खाली पडली, का

पुणे: पुण्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अर्बन लाईफ टॉवर या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने पतीसोबत झालेल्या भांडणानंतर इमारतीच्या आठव्या मजल्यावरून (Pune Crime News) उडी मारून आत्महत्या (Pune Crime News) केली. प्रतिभा शंकर असं आत्महत्या करण्याऱ्या महिलेचं नाव असून घटनेपूर्वी घरातील अंतर्गत कलह असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे. घरात अंतर्गत कलह झाल्याने संबंधित महिलेनं रागाच्या भरात त्या महिलेने (Pune Crime News) बाल्कनीतून उडी मारली. (Pune Crime News)

Pune Crime News: पाहता पाहता तिचा हात निसटला अन्…

आठव्या मजल्यावरून खाली पडून तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.सोसायटीमधील दुसऱ्या एका रहिवाशाने ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली. व्हिडिओमध्ये दिसते की, ती महिला काही वेळ बाल्कनीच्या रेलिंगला धरून होती आणि जवळचे लोक मदतीसाठी ओरडत होते, पण पाहता पाहता तिचा हात निसटला आणि ती थेट जमिनीवर पडली. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस आता वादाचे कारण आणि त्या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले गेले होते का, याचा तपास करत आहेत.(Pune Crime News)

Pune Crime News: नेमकं प्रकरण काय?

पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील तळेगाव एमआयडीसी परिसरामध्ये एक अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. एका उच्चभ्रू इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका 34 वर्षाच्या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विवाहित महिला इमारतीच्या आठव्या वरून पडत असतानाची दृश्य मोबाईल कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील काकडे वीटीपीआर अर्बन लाइफ सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेत प्रतिभा मनीष शंकर व 34 वर्ष या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल दुपारी दीड वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रतिभा मनीष शंकर या महिलेने घरगुती वादातून आत्महत्या केली का ? तिचा अपघाताने खाली पडून मृत्यू झाला? या विषयाचा तपास आता तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. मात्र सध्या तिच्या मृत्यू प्रकरणात तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.