चर्चेचा अर्थ शरणागती नाही, इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला सुनावले खडेबोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. चर्चा करणे म्हणजे कमकुवतपणा किंवा शरणागती पत्करणे असा होत नाही, असे खडेबोल त्यांनी सुनावले आहेत. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

युद्धातील नुकसानीचा आढावा आणि पुनर्बांधणी संदर्भात आयोजित बैठकीत पेजेश्कियन बोलत होते. ते म्हणाले की, “इराण आपल्या लोकांच्या अधिकारांचे आणि देशाच्या हिताचे रक्षण मजबूतीतीने करेल. चर्चेचा उद्देश इराणी जनतेच्या हक्कांचे रक्षण करणे आणि देशाचे हित सुरक्षित ठेवणे हाच आहे.”

दुसरीकडे इराणचे नवे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. खतम अल-अनबिया संयुक्त सैन्य कमांडचे प्रमुख अली अब्दोल्लाही यांनी मुज्तबा खामेनी यांची भेट घेतली. त्यांच्या वडिलांचा मृत्यू आणि त्यांच्यावरील हल्ल्याच्या बातम्यांनंतर मुज्तबा खामेनी सार्वजनिकरित्या दिसले नव्हते, त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या भेटीत अब्दोल्लाही यांनी सर्वोच्च नेत्यांना इराणी सैन्य, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स, पोलीस, सुरक्षा दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या सज्जतेची माहिती दिली. मुज्तबा खामेनी यांनी लष्कराचे कौतुक केले असून शत्रूचा खंबीरपणे सामना करण्यासाठी नवीन निर्देश दिले आहेत.

Comments are closed.