सूर्यकुमार यादवने लेकीचे ठेवले हे नाव; काय आहे नावाचा अर्थ? वाचा सविस्तर
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या घरी सध्या लक्ष्मीच्या आगमनाने आनंदाचं वातावरण आहे. सूर्यकुमार यादव आणि पत्नी देविशा शेट्टी एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहेत. सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर एक गोड पोस्ट शेअर करून लेकीच्या जन्माची माहिती दिली होती. लग्नाच्या १० वर्षांनंतर हे जोडपं पहिल्यांदाच आई-बाबा झालं. सूर्याने आता अजून एक फोटो पोस्ट करत लेकीचं नाव जाहीर केलं आहे.
सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लेक झाल्याची घोषणा करत आपला आनंद व्यक्त केला. कॅप्शन आणि फोटोमधून पालकत्वाचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. “आनंद, हास्य आणि अनेक स्वप्नांसहस आम्ही आमच्या लहान परीचे स्वागत करतो,” असे सूर्यकुमार यादवने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. पत्नी देविशा व सूर्याने आपल्या लाडकी परीचं बोट पकडलेला गोड फोटो शेअर केला.
सूर्यकुमार यादव आणि पत्नी देविशा शेट्टी यांनी मुलीचं नाव ‘रिधिमा‘ असं ठेवलं आहे. सूर्याने लेकीला हातात धरलं आहे आणि मागे देविशा त्याला धरून उभी असून दोघेही त्या गोंडस लेकीला न्याहाळतानाचा फोटो पोस्ट करत सूर्यादादाने लेकीचं नाव जाहीर केलं आहे. सूर्यादादाच्या लेकीच्या नावाचा रिधिमाच्या नावाचा अर्थ देवी लक्ष्मीशी जोडला जातो. रिधिमा शब्दाच अर्थ म्हणजे जी घरात आनंद, भरभराट, यश आणि प्रेम घेऊन येते.
सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी २०१६ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. देविशा अनेकदा स्टेडियममध्ये सूर्यकुमार यादवला प्रोत्साहन देताना दिसते. ही जोडी क्रिकेट जगतातील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक मानली जाते. सध्या रिधिमाच्या येण्याने यादव कुटुंबात आनंदी आनंद साजरा केला जात आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान देविशाचे फोटो पाहून ती प्रेग्नंट असल्याची चर्चा होती, पण दोघांनीही यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी देविशाच्या डोहाळेजेवणाचा व्हीडिओ समोर आला होता.
आता आयपीएल २०२६ दरम्यान ७ मे रोजी त्याच्या लेकीचा जन्म झाला. यानंतर आता सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी करो या मरो सामना खेळण्यासाठी रायपूरमध्ये दाखल झाला आहे. सूर्यकुमार यादवने एअरपोर्टवर पॅपराझींना मिठाईदेखील वाटली, ज्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Comments are closed.