जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार; तटकरेंची पहिली प्रतिक्रिय
सुनील तटकरे सुनेत्रा पवारांवर अजितदादांनी (Ajit Pawar) एकदा मुख्यमंत्री व्हावं, अशी सर्वच बारामतीकरांची इच्छा होती. आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तसे कष्ट घेत आहेत. मला वाटतं सुनेत्रा पवारच 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीमधून उभ्या राहतील आणि आता आमच्या सर्वांची इच्छा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असं विधान राष्ट्रवादीचे युवा नेते तथा अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार (Jay Pawar) केलं होतं. जय पवारांच्या या विधानावर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील जय पवारांच्या विधानावर भाष्य केलं आहे. (Jay Pawar On Sunetra Pawar)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी सुनील तटकरेंना जय पवारांनी केलेल्या विधानावरुन प्रश्न विचारला. यावर एक नेतृत्व मनातलं तयार व्हावं. यातही प्रत्येकाला वाटतं त्या भावनेतून जय पवार यांनी हे विधान केलं असावं. मनातील इच्छा खूप आहेत. परंतु राजकीय वास्तव्य समजून घेऊन आम्ही काम करत आहोत. आमचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएमधून पुढे काम करुन वाटचाल करणार आहे, असं सुनील तटकरेंनी सांगितले. (Sunil Tatkare On Sunetra Pawar)
रोहित पवार काय म्हणाले? (Rohit Pawar On Jay Pawar)
जय पवारांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, आमची ही इच्छा होती आणि दादांचीही इच्छा होती की 2029 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करावे. आमची इच्छा कुणासाठी होती तर ती अजितदादांसाठी होती. अजित दादा कार्यकर्त्यांमध्ये मिसळून दोन्ही पक्ष एकत्रित आल्यानंतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि रस्त्यावरची लढाई लढून 2029 मध्ये आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी दादांची इच्छा होती. मला असं वाटतं की, या राज्यात भाजपसोडून दुसरा कोणताही मुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर भाजपला विरोध करावाच लागेल, असे म्हणत राष्ट्रवादी रोहित पवार यांनी जय पवार यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. जर दादांच्या शेवटच्या चार महिन्यांचे वक्तव्य बघितले तर दादा भाजपचा विरोधच करत होते. जर आपण कुणी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघत असाल तर भाजपचा विरोधच करावा लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी आणि जय पवार यांना भाजपला विरोध केल्याशिवाय मुख्यमंत्री होता येणार नाही, असे रोहित पवार यांनी सूचवले.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.