मुंबई IPL मधून बाहेर होताच विराट कोहली मैदानात सुटला पळत… सेलिब्रेशन पाहून चाहतेही अवाक्, शेव
विराट कोहली सेलिब्रेशन RCB vs MI IPL 2026 :आयपीएल 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात आरसीबीने शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत 2 विकेट्सने अविस्मरणीय विजय मिळवला. मुंबईसाठी हा सामना ‘करो या मरो’सारखा होता, पण आरसीबीच्या जिद्दीसमोर त्यांचे सर्व स्वप्न भंगले. 167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमार याने ठोकलेला जबरदस्त षटकार आणि अखेरच्या चेंडूवर रसिख सलाम दारने दाखवलेला संयम आरसीबीला विजयापर्यंत घेऊन गेला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी मोठी टीम ठरली.
विराटचं सेलिब्रेशन सोशल मीडियावर व्हायरल
विराट कोहलीच्या चेहऱ्यावर मुंबई इंडियन्सला स्पर्धेबाहेर केल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. अखेरच्या चेंडूवर राज अंगद बावाच्या हाताला लागून चेंडू दूर गेला आणि आरसीबीच्या फलंदाजांनी दुसरी धाव पूर्ण करताच विराटने आपल्या खास आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केलं. त्याचा हा रिएक्शन सोशल मीडियावर “मोमेंट ऑफ द मॅच” ठरला आहे. विराटचा जोश, त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि भावनांचा स्फोट पाहून चाहतेही भारावून गेले.
#RCB चाहत्यांनो, आता मज्जा कशी आहे? 😅❤️
🎥 अन 𝗮𝗯𝘀𝗼𝗹𝘂𝘁𝗲𝗹𝘆 𝗺𝗶𝗻𝗱-𝗯𝗹𝗼𝘄𝗶𝗻𝗴 घ्या रायपुरात पूर्ण @RCBTweets पॉइंट टेबलच्या 🔝 पर्यंत 🔢👏
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/wYlCB10dhm#TATAIPL | #खेलबिंदास | #RCBvMI pic.twitter.com/BcYyHO01gB
— इंडियन प्रीमियर लीग (@IPL) 10 मे 2026
सामना संपताच विराट सीमारेषेवरून धावत मैदानाच्या मध्यभागी पोहोचला. हवेत जोरदार फिस्ट पंप करत त्याने कृणाल पंड्याला मिठी मारली. विराटचा हा अंदाज त्याच्या जुन्या आक्रमक शैलीची आठवण करून देणारा होता. रायपूर मधील संपूर्ण स्टेडियम आरसीबी-आरसीबीच्या घोषणांनी दणाणून गेले होते आणि विराट वारंवार स्टँडकडे इशारा करत चाहत्यांचा उत्साह वाढवत होता.
विजयानंतर भुवीला मारली भावनिक मिठी…
विजयानंतर विराटने सामन्याचे हिरो ठरलेल्या भुवनेश्वर कुमार आणि क्रुणाल पंड्याला मिठी मारली. मात्र याचदरम्यान त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो मुंबई इंडियन्सच्या डगआउटकडे वळून काहीतरी ओरडताना दिसतो. मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील जुनी कट्टर स्पर्धा पुन्हा एकदा या क्षणी दिसून आली. विराटसाठी हा विजय फक्त दोन गुणांचा नव्हता, तर स्पर्धेतील सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा क्षण होता.
पॉइंट्स टेबलमध्ये RCB नंबर 1
या विजयानंतर आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. 11 सामन्यांत 14 गुणांसह त्यांची प्लेऑफकडे दमदार वाटचाल सुरू आहे आणि आता फक्त एका विजयाची गरज आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2026 मधील प्रवास संपला. या सामन्यात क्रुणाल पंड्याची 73 धावांची झुंजार खेळी आणि भुवनेश्वर कुमारची 4 विकेट्सची घातक गोलंदाजी आरसीबीच्या विजयाची सर्वात मोठी ताकद ठरली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.