व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल
सोलापूर : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात एकीकडे पेट्रोल आणि डिझेलची कमतरता जाणवत असून अद्यापही घरगुती गॅससाठी सर्वसामान्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या आखाती देश, अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी करण्यात आली असली तरीही गतकाळातील आणि भविष्यातील परिस्थितीमुळे देशवासीयांना काही बंधने घालून पुढे जावे लागेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशवासीयांना काही महत्त्वाची आवाहनं केली आहेत. त्यामध्ये, वर्षभर सोनं (Gold) खरेदी करू नका, असे आवाहनही मोदींनी केलं. त्यावरुन, आता सराफ व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनाचा पहिला फटका सराफ व्यापाऱ्यातील कामगारांना, कारागिरांना बसेल, असे सराफ व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.
नागरिकांनी वर्षभर सोनं खरेदी करू नये, घरातील कुठल्याही सोहळ्यासाठी सोन्या दागिने खरेदी करणे टाळावे, पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करावा, असे महत्त्वाचं आवाहन मोदींनी केलंय. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींचे आवाहन योग्य असल्याचं म्हटलं. मात्र, आता मोदींच्या या आवाहनानंतर सराफ व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर, पेट्रोल डिझेलच्या वापरावर बंधन आणले जात असल्याने वाहनधारकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, अगोदर मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करा, त्यांच्याकडून होणारी उद्घाटनं ऑनलाईन करा, तीन-तीन मंत्र्यांची काय गरज? अशा शब्दात नागरिकांना सरकारला प्रतिसवाल केलाय.
सराफ व्यापाऱ्यांचा संताप (Gold jeweller solapur)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनाला सराफ व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. पंतप्रधानांनी आवाहन केले असले तरी त्यांनी सराफ व्यापाऱ्यांचा विचार केला नाही. सोने व्यापारातील पहिला फटका कामगारांना बसेल. सोने व्यापारी वर्षभर सोनं नाही विकले तरी जगू शकतात. मात्र, कारागिरांनी कसे जगायचे? असा सवाल सराफ व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय. पंतप्रधानांचे हे अपयश आहे, कारण गेल्या दहा वर्षात ते पंतप्रधान आहेत, अशा शब्दात सराफ व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोने म्हणजे ऐनवेळी मदतीला येणार दागिना आहे, त्यामुळे लोक सोने खरेदी करणे बंद करणार नाहीत. सोलापुरातील सराफ व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर उत्तर देताना संतप्तपणे आपली भूमिका मांडली.
मोदींच्या आवाहनावर पुणेकरांची नाराजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल कमी वापरा आणि मेट्रोचा वापर करा असेही आवाहन केलं. या आवाहनावर पुणेकरांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. कोणी काय वापरायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा मेट्रो सोईस्कर पडत नाही. त्यामुळे मोदींनी आवाहन करताना विचार करायला हवा, असं मत पुणेकरांनी व्यक्त केलं आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.