गोंदियाच्या जिल्हा परिषदेतील लाचखोर कनिष्ठ लिपीक ACB च्या जाळ्यात, 45 हजारांची लाच घेताना पकडलं

गोंदिया क्राईम न्यूज : गोंदिया जिल्हा परिषद येथील लाचखोर कनिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. सेवा निवृत्तीचे कागदपत्रे लवकर तयार करून देण्याचे सांगून केली 50 हजार लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 45 हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

सेवा निवृत्तीचे कागदपत्रे लवकर तयार करून देण्यासह पे फिक्सेशन बरोबर नसल्याचे सांगून 1.92 लाखाची रिकव्हरी वाचवून देण्याच्या नावावर  कनिष्ठ लिपीकाने 50 हजार रुपयांची लाच मागितला होती. जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील कनिष्ठ लिपीकाला गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 45 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. संदेश सांभरे कनिष्ठ लिपीक, जि.प. गोंदिया असे लाचखोर कनिष्ठ लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार हे जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त कर्मचारी असून त्यांना सेवा निवृत्तीची कागदपत्रे तयार करायची असल्याने त्यांनी कनिष्ठ लिपीक सांभरे यांच्याकडे प्रस्ताव सादर केले.

दरम्यान, 7 मे रोजी आरोपी संदेश सांभरे याने तक्रारदार यांच्याकडे सेवानिवृत्तीची कागदपत्रे लवकर तयार करून देण्यासाठी व त्यांच्या प्रकरणात पे फिक्सेशन बरोबर नसून त्यांच्यावर 1 लाख 92 हजार रुपयांची रिकव्हरी निघत असल्याचे सांगून सदर रिकव्हरी वाचवून देण्याच्या नावावर 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदारांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी सोमवारी गोंदिया येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पथकाने आज दुपारी सापळा कारवाई केली असता आरोपी संदेश सांभरे हा तडजोडीतून 45 हजार रुपयांची लाच घेताना मिळून आला. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

आणखी वाचा

Comments are closed.