सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगित
नरेंद्र मोदी सोन्याच्या पेट्रोल डिझेलवर पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं (Gold) खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Petrol Diesel) वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं. तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरु करावेत असंही नरेंद्र मोदी म्हणाले. सलग दोन दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. परकीय चलनाला मिळणारी चालना थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केलं. हैदराबादपाठोपाठ गुजरातमध्येही मोदींनी हे आवाहन केलं. (Narendra Modi On Gold Petrol Diesel)
आखाती युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या अपुऱ्या पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांत इंधन दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळात नेमकी काय परिस्थिती ओढावणार आहे, याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकरांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आखाती देशांमधली युद्धाची परिस्थिती चिघळली तर आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये तेल खरेदी करावं लागेल, त्यामुळे पंतप्रधानांचं आवाहन अत्यंत संयुक्तीक असल्याचं वक्तव्य शैलेंद्र देवळाणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं. (Shailendra Deolankar On Narendra Modi)
आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर काय काय म्हणाले? (Shailendra Deolankar On Narendra Modi)
पंतप्रधानांनी भारतीयांना केलेलं आवाहन हे अत्यंत सयुक्तीक आणि योग्य वेळेला केलं गेलं आहे. आखातामधील संघर्ष अजून सुटलेला नाहीय. अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून केवळ 10 टक्के जहाजांचा प्रवास होत आहे. आखातात अजूनही परिस्थिती स्फोटक आहे, कधीही संघर्ष चिघळू शकतो, अशी धक्कादायक माहिती शैलेंद्र देवळाणकरांनी दिली. 76 देशांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत अमेरिकेतही वाढल्या आहेत. भारतीयांना सोन्याचे दागिने, डेस्टिनेशन वेडिंग यात रस असतो. जानेवारी 2026 मध्ये 12 बिलियन डॉलर इतकं सोनं भारतीयांनी आयात केलं.सोन्याचा, तेलाचा व्यवहार हा प्रामुख्याने डॉलरमध्ये केला जातो. ही वेळ डॉलरची सेव्हिंग करण्याची वेळ आहे, अशी माहिती शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली. सेंद्रिय खतांचा वापर करा, युरियाचा वापर कमी करा…परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करणे थांबवा. जेणेकरून डॉलरचा कमी वापर होईल. भविष्यातला संघर्ष गृहित धरून हे नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन आहे, असंही शैलेंद्र देवळाणकरांनी सांगितले.
नरेंद्र मोदींच्या आवाहनामागील मोठी कारणं- (why pm modi appeal for work from home and not to buy gold)
एकंदरीत पाहता, या सर्व घटकांमुळे सरकारवर आपला डॉलर साठा जपून ठेवण्याचा दबाव वाढला आहे. याचे कारण असे की, जेव्हा जेव्हा भारत वस्तूंची आयात करतो, उदा. तेल, वायू (गॅस), सोने किंवा खते तेव्हा त्याचे पेमेंट (पैसे) डॉलरमध्ये केले जाते. परिणामी, जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात, तेव्हा अधिक प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो आणि रुपयाची स्थिती कमकुवत होते. नेमक्या याच कारणामुळे सरकार जनतेला अनावश्यक खर्च कमी करण्याचे आवाहन करत आहे. जसे की सोन्याची खरेदी करणे, इंधनाचा अतिवापर करणे किंवा परदेश प्रवास करणे. अशा उपाययोजनांमुळे डॉलरची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास मदत मिळेल. पंतप्रधानांचे हे आवाहन एक ‘सावधगिरीचा उपाय’ म्हणून पाहिले जात आहे; जागतिक संकटाच्या काळात भारताच्या आर्थिक स्थितीचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या मोठ्या आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? (Narendra Modi On Gold Petrol Diesel)
- सोन्याची खरेदी टाळा
- पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा
- वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
- परदेश प्रवास टाळा
- खाद्यतेलाचा वापर कमी करा
- नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
- स्वदेशी उत्पादनं वापरा
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.