सरकारी बाबूंच्या चुक, 28 वर्ष हक्काच्या आरक्षणासाठी लढा; ओबीसी जातींमधील तरुणांची कैफियत

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा : महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गातील 27 जातींना केंद्राचे आरक्षण (OBC Reservation) मिळत नसल्याचे आणि त्यामुळे दोन कोटी नागरिक केंद्रीय आरक्षणाच्या लाभापासून वंचित असल्याचे दुर्दैवी वास्तव एबीपी माझाने गेल्या दोन दिवसात सर्वांसमोर आणले. केंद्राच्या आरक्षणासाठीच्या ओबीसीच्या यादीत फक्त काना, मात्रा, उकार, वेलांटी, कॉमा, स्पेलिंग अशा शुल्लक चुका असणे, त्यामागचे कारण असल्याचेही एबीपी माझाने समोर आणले. मात्र याच मालिकेत जे दुर्दैवी वास्तव आज आम्ही तुम्हला सांगणार आहोत, ते पाहून तुमचाही संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील 27 जाती केंद्राच्या आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष लढा देत आहेत. मात्र या जातीतील विद्यार्थ्यांना, तरुणांना आरक्षणाचे लाभ मिळत नसल्याने अनेकांना त्यांची क्षमता असतानाही त्यांच्या जीवनात अनेक समझोते करावे लागले. हवं असलेलं शिक्षण घेता आलं नाही. शिक्षण घेऊन मनासारखी नोकरी मिळवता आली नाही आणि नोकरी मिळालीf तर ती जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे टिकवता आली नाही. केंद्रातील आरक्षणासाठी लढा देणाऱ्या 27 ओबीसी जातींमधील तरुणांची ही व्यथा त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून प्रशासनापुढे मांडली आहे.

OBC Reservation :  ‘डब्ल्यू’ ऐवजी ‘व्ही’ अक्षर असल्यामुळे नोकरीच्या संधी गमवाव्या लागल्या

केंद्राचा ओबीसी आरक्षणाचा लाभ नसल्यामुळे बँक पीओच्या परीक्षेत सुरुवातीला अवघ्या तीन मार्काने दोन वर्ष अपयश आले. अखेर जास्त मेहनत करून तिसऱ्या वर्षी खुल्या वर्गातूनच बँक पीओची पोस्ट मिळवली. मात्र यामध्ये आयुष्याचे दोन वर्ष वाया गेले. असे एक तरुणाचं म्हणणं आहे. तरपोस्ट ग्रॅज्युएशन करताना केंद्रीय आरक्षणाचा लाभ न मिळाल्यामुळे खुल्या वर्गातून पूर्ण फी भरून शिक्षण घ्यावं लागलं. केंद्राच्या स्कॉलरशिपचा लाभ देखील मिळाला नाही. असे एका तरुणाचं करू नका आहे. तर गोवारी समाजातील अनेक तरुणांना केंद्राच्या यादीत ‘डब्ल्यू’ ऐवजी ‘व्ही’ अक्षर असल्यामुळे नोकरीच्या संधी गमवाव्या लागल्याची गुणवत्ता यातील एका तरुणाने मांडली आहे.

OBC Reservation : 90 टक्के गुण असूनही केंद्रीय शिष्यवृत्ती मिळवून परदेशात शिक्षणाला जाता आलं नाही

भोयर समाजाच्या तरुणाला दहावी-बारावीत 90 टक्के गुण असूनही केंद्रीय शिष्यवृत्ती मिळवून परदेशात शिक्षणाला जाता आलं नाही. परिणामी त्याला आज नागपुरात खाजगी नोकरी करत आयुष्याशी समझोता करावा लागला आहे. अशाच एका तरुणाच्या वडिलांनी बोलताना सांगितलं तेअत्यंत हुशार मुलासाठी केंद्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. केंद्रीय यादीनुसार ओबीसी जात प्रमाणपत्र नसल्यामुळे मुलाला हवं त्या केंद्रीय महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही. असे अनेक प्रकार घडले असून त्याचा नाहक त्रास तरुणांसह त्यांच्या पालकांना सहन करावा खर्च आहे.

Parinay Fuke : राज्यातील ओबीसींच्या 27 जातींच्या केंद्रीय आरक्षणाचा मुद्दा आता अमित शहा यांच्यापर्यंत जाणार

केंद्राच्या आरक्षण यादीत महाराष्ट्रातील ओबीसींच्या 27 जातींना आरक्षण मिळवण्यात येत असलेल्या अडचणीच्या बाबतीत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी बंगाल निवडणुकीनंतर भेटण्यास सांगितले होते. लवकरच महाराष्ट्रातील 27 जातींच्या प्रतिनिधीसह अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजप आमदार परिणय फुके यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील तब्बल दोन कोटी नागरिकांना केंद्रीय आरक्षणात अडचणी येत असून त्यांना न्याय मिळालंच पाहिजे आणि त्यासाठीच सर्व जातींच्या प्रतिनिधींचा अमित शहा यांना दिल्लीत भेटणार असल्याचे फुके म्हणाले. वर्षानुवर्षे हे प्रकरण न सुटल्यामुळे ओबीसींच्या अनेक तरुणांचे करिअर आणि भवितव्य बाधित झाल्याचेही फुके यांनी मान्य केल्या आहे.

आणखी वाचा

Comments are closed.