‘कृष्णावतारम’चा कन्हैया कोण? प्रसिद्ध निर्मात्याचा भाऊ असूनही त्यांच्यात नाही संवाद, तर‘हुडी बॉय’ बनून मिळाली होती ओळख – Tezzbuzz
अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. म्हणजेच खुप आधी पासुनच प्रेक्षकांना धार्मिक कथा चित्रपट, मालिका यांची क्रेझ 8 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. आणि आता या चित्रपटाची आणि यातील कलाकांराबाबत सध्या चर्चा सुरु आहे. आणि त्यातील जास्त करुन भगवान कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. तर हा अभिनेता कोण आहे. हे जाणुन घेवुयात.
‘कृष्णावतारम पार्ट 1: हृदयम’मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ गुप्ता (gupta)आहे. त्याच्या अभिनयाची आणि रूपाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मात्र, फार कमी लोकांना हे माहीत आहे की सिद्धार्थ हा प्रसिद्ध टीव्ही निर्माता आणि बिग बॉस 11 फेम विकास गुप्ताचा भाऊ आहे. होय, तोच विकास गुप्ता, ज्याचे बिग बॉस 11 दरम्यान शिल्पा शिंदेसोबत सतत खटके उडत होते. तर सिद्धार्थ हा याच विकास गुप्ताचा धाकटा भाऊ आहे. मात्र, अनेक वृत्तांनुसार, गेल्या काही वर्षांपासून विकास आणि सिद्धार्थ यांच्यात मतभेद आहेत त्यामुळे ते कधी एकत्र दिसत नाहित.
सिद्धार्थ गुप्ताच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2014 मध्ये झाली. तो सर्वप्रथम कुकू माथूरच्या ‘झंड हो गई जिंदगी’ या चित्रपटात दिसला. त्यांनतर त्याने अनेक अभिनयात कामे केली मात्र , सिद्धार्थचा सर्वाधिक चर्चेत राहिलेला परफॉर्मन्स म्हणजे तो प्रसिद्ध गायिका ध्वनी भानुशाली यांच्या ‘वास्ते’ या गाण्यात दिसला. या गाण्यातील त्याचा हुडी लूक व्हायरल झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
शर्वरी वाघला सिव्हिल इंजिनिअर व्हायचे होते, पण एका प्रश्नाने बदलले तिचे आयुष्य
Comments are closed.