मुंबईत सेलिब्रिटींच्या हॉटेल-रेस्टॉरंटच्या मराठी पाट्यांवरून महापालिकेत सवाल; अनेक ठिकाणी नियमा
मुंबईतील मराठी सूचनाफलक: दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठीत असणे बंधनकारक (Marathi Signboards In Mumbai) असतानाही अनेक ठिकाणी अद्याप नियमांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा मुद्दा मुंबई महापालिकेच्या विधी समितीत उपस्थित करण्यात आला. विशेषतः सेलिब्रिटींच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटवरील नामफलक मराठीत नसल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधत प्रशासनाला जाब विचारला.
भाजपचे गटनेते तेजिंदर सिंग तिवाना यांनी हा मुद्दा उपस्थित करत शहरातील किती आस्थापनांनी मराठी नामफलक लावले आहेत, किती ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याची माहिती मागितली. यावर संबंधित विभागाकडून बुधवारी, 13 मे रोजी विशेष बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. (Marathi Signboards In Mumbai)
आस्थापनांकडून महापालिकेच्या नोटिशींना न्यायालयात आव्हान- (Marathi Signboards In Mumbai)
समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी सेलिब्रिटींच्या हॉटेल-रेस्टॉरंटना कायद्यापासून सूट देण्यात आली आहे का, असा सवाल उपस्थित केला. पुढील आठवड्यात कोणत्याही विभागाच्या भेटीदरम्यान मराठी पाट्या आढळल्या नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांना मेमो देण्यात येईल, असा इशाराही समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी दिला. दरम्यान, काही आस्थापनांनी महापालिकेच्या नोटिशींना न्यायालयात आव्हान दिल्याची माहितीही बैठकीत समोर आली. यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाने कायदेशीर बाबींचा आढावा घेऊन कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. कायद्यानुसार नामफलकावरील मराठी अक्षरांचा फॉन्ट 80 टक्के आणि इतर भाषेतील अक्षरांचा फॉन्ट 20 टक्के असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले.
भाजपचे नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना काय म्हणाले? (Marathi Signboards In Mumbai)
मराठी भाषेला अभिजात दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. उच्च न्यायालयाचा निर्देश आहे, दुकानांवर मराठी पाटी असणं गरजेचं आहे. मात्र 5 हजारांपर्यंत दुकानांवर पाट्या नाहीत. मी विधी समितीत आज हरकतीचा मुद्दा घेतला आणि स्पष्ट बोललो अधिकारी झोपले आहेत का? लायसन्स इन्स्पेक्टर यांना दिसत नाही का? मराठी नावं छोटी आणि इंग्रजी नावं मोठी आहेत. माझ्या स्वतःचा रस्ता आहे, ज्यात वेस्टइन हॉटेल, जेपी मॉर्गन कंपनी असेल त्यांची नावं इंग्रजीतच आहेत. मोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रिटींच्या हॉटेलला देखील बदल केले दिसत नाही असा आरोप आहे. मी मुंबईत जन्माने वाढलो आहे. पालिकेची जबाबदारी आहे हे करुन घेणे, असं तेजिंदर सिंह तिवाना म्हणाले.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:
संबंधित बातमी:
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आणखी वाचा
Comments are closed.