तेलगू सुपरस्टार भरतकांत याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला
सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक यांचाही मृत्यू
वृत्तसंस्था/ चेन्नई
तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता भरतकांत आणि सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक यांचे रस्ते अपघातात निधन झाले. हैदराबाद आउटर रिंग रोडवर अभिनेते भरतकांत यांच्या कारची एका कंटेनर ट्रकला धडक बसल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे तेलुगू चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. भरतकांत आणि जी. साई त्रिलोक नेल्लोरहून हैदराबादला परत येत असताना आदिबटला पोलीस ठाण्याच्या हद्दीत आउटर रिंग रोडच्या एक्झिट 12 जवळ हा अपघात झाला. पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानुसार, अभिनेता भरतकांत गाडी चालवत असताना गाडीची एका कंटेनर ट्रकशी टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की गाडीचे पूर्णपणे नुकसान झाले. या अपघातात भरतकांत आणि जी. साई त्रिलोक दोघेही गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Comments are closed.