‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्याचे गीतकार जहीर आलम यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नव्वदच्या दशकात तुफान गाजलेल्या ‘तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याचे गीतकार जहीर आलम यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले जहीर आलम यांचे मोमीनपुरा परिसरात वास्तव्यास होते. त्यांनी ‘एम्प्रेस मिल’मध्ये काम करत असतानाही आपले साहित्य लेखन सुरू ठेवले. ते विदर्भातील एक संवेदनशील शब्दप्रभू म्हणून ओळखले जायचे. जहीर आलम यांनी लिहिलेले अल्ताफ राजा यांच्या आवाजातील ‘तुम तो ठहरे परदेसी’ हे गाणे त्याकाळी तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. हॉटेल्स, पानपट्टी, बस स्थानके, गल्लीबोळात हे गाणे ऐकू येऊ लागले. अनेक कॉलेज, शाळांमधील गॅदरिंगमध्ये तरुणाई या गाण्यावर थिरकू लागली. आजही या गाण्याचा एक विशेष चाहतावर्ग आहे. मात्र या गाण्याचे बोल लिहिणारे गीतकार जहीर आलम यांच्या वाटय़ाला फारशी प्रसिद्धी, पैसा आला नाही. गीतकार जहीर आलम यांचे संपूर्ण आयुष्य आर्थिक विवंचनेत आणि संघर्षातच गेले, अशी खंत त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली.

Comments are closed.