भाजीला पाण्याची फोडणी देण्याचं संशोधन सध्या सुरू आहे… रोहित पवार यांचा पंतप्रधानांना टोला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील सभेत बोलताना देशातील जनतेला काही गोष्टी बदलण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल डिझेल कमी वापरा. मेट्रोचा वापर करा, सोने खरेदी करू नका, परदेशवाऱ्या करू नका, जेवणात तेलाचा वापर कमी करा, असे मोदींनी जनतेला सांगितले आहे. त्यांच्या या आवाहनानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. एकीकडे यावरून विरोधकांकडून पंतप्रधानांवर जोरदार टीका होत आहे तर दुसरीकडे सोन्याच्या व्यावसायिकांमध्येही यावरून असंतोष पसरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दागिने बनवणाऱ्या कारागिरांचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर टीका केली आहे. ”देशात सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारागीरांची संख्या लाखोने असल्याने वर्षभर सोनं खरेदी न करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आवाहनाचा एकूणच सोनार व्यवसायासह या कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो. आजच्या महागाईच्या काळात जवळ पैसाच उरला नसल्याने सामान्य माणसाने त्याच्याकडील आहे तेच सोनं तारण ठेवल्याने नवीन सोनं घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसंच गेल्या दोन दिवसांपासून ज्या लोकांशी बोलणं झालं, चर्चा झाली त्यात लोकांचंच असं मत आहे की, पंतप्रधान मोदी साहेबांचं आवाहन हे व्यवहार्य आहे, असं वाटत नाही. राहिला प्रश्न तेलाचा… तर भाजीला पाण्याची फोडणी देण्याचं संशोधन सध्या सुरू आहे…” असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावला.

Comments are closed.