मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ

सोने आणि चांदीवर आयात शुल्क: केंद्र सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात (Import Duty) मोठी वाढ केल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत या मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.सरकारने सोन्या आणि चांदीवरील एकूण आयात शुल्क 6 वरून वाढवून 15 टक्के केलं आहे. यामध्ये 10 टक्के मूलभूत सीमा शुल्क (Basic Customs Duty) आणि 5 टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (AIDC) यांचा समावेश आहे. आयात शुल्क वाढीच्या बातमीमुळे कल्याण ज्वेलर्स आणि टायटन सारख्या ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. हे बदल मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले असून, यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीच्या मागणीवर आणि किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

किमतींवर झालेला परिणाम (सोने आणि चांदीवर आयात शुल्क)

या निर्णयामुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या जुलै 2026 च्या फ्युचर्समध्ये प्रति किलो 16,743 रुपयांची वाढ होऊन ती 2,95,805 रुपयांवर पोहोचली. सोन्याच्या जून 2026 च्या फ्युचर्समध्ये प्रति 10 ग्रॅम 9,206 रुपयांची (6 टक्के) वाढ होऊन किंमत 1,62,648 रुपये झाली. दुसरीकडे, अमेरिकेतील ग्राहक महागाई एप्रिलमध्ये वेगाने वाढल्यामुळे, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा कमी झाली आहे, ज्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेतील वातावरणावर झाला आहे.

तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला?

बाजारात सध्या प्रचंड अस्थिरता (Volatility) आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, ज्या गुंतवणूकदारांनी आधीच खरेदी (Long Positions) केली आहे, त्यांनी ठराविक टप्प्यावर नफा वसुली (Profit Booking) करणे फायद्याचे ठरू शकते.

विविध शहरांतील सोन्याचे दर (24 कॅरेट/8 ग्रॅम)

  • दिल्ली: 1,23,312 रुपये
  • मुंबई आणि हैदराबाद: 1,23,192 रुपये
  • चेन्नई: 1,25,072 रुपये

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.