विजयच्या चाहत्यांची मागणी पूर्ण होणार? आगामी ‘जन नायगन’ चित्रपटाच्या टायटल कार्डवर ‘मुख्यमंत्री विजय’ नाव देण्याची चाहत्यांची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांच्या शेवटच्या ‘जन नायगन’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सोशल मीडियावर चाहते मागणी करत आहेत की चित्रपटाच्या टायटल कार्डवर ‘थलपथी विजय’ ऐवजी ‘मुख्यमंत्री विजय’ असे नाव लावण्यात यावे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजयने मुख्यमंत्री बनण्याचे आपले ध्येय यशस्वीपणे पूर्ण केले आहे. मात्र, राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीचा त्यांचा शेवटचा चित्रपट, ‘जन नायगन’ अद्याप चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला नाही.

हा चित्रपट वादाच्या कचाट्यात सापडल्यामुळे चित्रपट प्रदर्शित व्हायला वेळ लागणार आहे. परंतु विजय आता निवडणूक जिंकून तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळेच आता विजयच्या चाहत्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. विजयच्या चाहत्यांनी आता ‘जन नायगन’च्या निर्मात्यांकडे एक नवीन मागणी केली आहे. मुख्य म्हणजे ही मागणी पूर्ण होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दाक्षिणात्य कलाकारांची क्रेझ ही सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच चाहत्यांनी आता सुरुवातीच्या टायटल कार्डवर ‘मुख्यमंत्री विजय’ असा बदल करावा, अशी मागणी चाहत्यांकडून जोर धरू लागली आहे. असे वृत्त आजतक ने दिले आहे. विजयने नुकतीच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा ‘मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय’ असे नाव असलेले एक बनावट टायटल कार्ड शेअर करण्यात आले होते.

विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर, आता ‘जन नायगन’चे निर्माते व्यंकट के नारायण यांना चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल चौकशी सुरू झाली आहे. इंडिया टुडेशी बोलताना व्यंकट यांनी आशा व्यक्त केली की सेन्सॉर बोर्ड आता ‘जन नायगन’ला प्रमाणपत्र देईल. दुसऱ्या एका मुलाखतीत व्यंकट म्हणाले की, चाहत्यांची जी मागणी आहे, तेच टायटल कार्ड आता ‘जना नायगन’मध्ये ठेवायचे आहे. व्यंकट यांच्या वक्तव्यामुळे ‘जन नायगन’बद्दलची चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

Comments are closed.