MIMला आणखी एक धक्का; बनावट बोनाफाईडच्या आधारे निवडणूक लढवली; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या (AIMIM) अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या (छत्रपती संभाजीनगर) वतीने एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय आज (बुधवारी) सकाळी बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या (Mateen Patel Home Demolition) प्रकरणात केली आहे. अशातच हे प्रकरण ताजं असतानाच आता एमआयएमचे नगरसेवक मेराज खान जलील खान गंभीर आरोपांमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. निवडणूक शपथपत्रात तिसऱ्या अपत्याची माहिती जाणीवपूर्वक लपवणे, खोट्या जन्म प्रमाणपत्र दाखल्यावर बोनाफाईड प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणे आणि खोटी माहिती सादर करून निवडणूक लढवल्याचा आरोप मेराज खान यांच्यावर करण्यात आला आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
दरम्यानया प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी मेराज खान (Meraj Khan Jalil Khan) यांच्यासह एका शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक केली असून आणखी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित पाच आरोपींचा देखील शोध सुरू असून आम्ही त्यांना लवकरच ताब्यात घेऊ अशी माहिती पोलीस उपआयुक्त पंकज अंतुलकर यांनी दिलीहे.
MIM : व्यापाऱ्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याच्या तपासात बनावटगिरीचे बिंग फुटले
छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक कार्पोरेट जीहाद मधील आरोपी निदा खानला लपवण्यामध्ये एमआयएमच्या नगरसेवक मतीन पटेल याचं नाव समोर आलं आणि पक्ष अडचणीत आला. अशातच आता त्यात आणखीन एक भर पडलीय. एमआयएमच्या आणखी एका नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. मिराज खान जलील खान असं या नगरसेवकाचे नाव आहे. महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकपद अबाधित ठेवण्यासाठी दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचा नियम धाब्यावर बसवून, स्वतःच्या तिसऱ्या मुलाला सख्ख्या भावाचा मुलगा असल्याचे भासवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट जन्मदाखला आणि शाळेचे खोटे बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करून शासनाची आणि मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेराज खान, त्यांच्या पत्नी, भाऊ, भावजय आणि एका शाळेच्या मुख्याध्यापकासह सात जणांविरुद्ध शहर चौक पोलीस ठाण्यात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापाऱ्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या तपासातून या संपूर्ण बनावटगिरीचे बिंग फुटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.