ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन उडी
ठाणे : जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवरुन टाकणारी बातमी समोर आली असून ठाणे महापालिकेच्या डॉ. मोहक डिंगा (डॉक्टर) यांनी राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हकीम अजमल खान रुग्णालयात (hospital) शारर्मिंग डिंगा डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. ठाण्यातील ग्रेस स्कोअर बिल्डिंगमधून आज सकाळी सहाव्या मजल्यावरून उडी मारुन त्यांनी आपले जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून प्रशासकीय वर्तुळात या घटनेनं खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) अधिक तपास सुरू आहे.
राहत्या घरातील 6 व्या मजल्यावरुन उडी मारल्याने डॉ.शारमिंग डिंगा यांचा जागीच मृत्यू झाला असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. याप्रकरणी, मुंब्रा पोलिसांच्या माध्यमातून अधिकचा तपास सुरू आहे.
हेही वाचा
NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
आणखी वाचा
Comments are closed.