Pandharpur news – आधी तळघर, आता रांजण सापडला; भाविकांच्या पाणपोईसाठी होत होता वापर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असताना काही महिन्यापूर्वी तळघर आढळून आले होते. त्यानंतर आता भव्य असा दगडी रांजण खोदकामात सापडला आहे. या रांजणाचा मागोवा घेतला असता संत माणकोजी बुवा बोधले महाराज यांनी 1645 मध्ये हा रांजण विठ्ठल भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी भेट दिल्याचे कागदपत्रांतून समोर येते.

माणकोजी महाराज बोधले हे दानशूर विठ्ठल भक्त म्हणून ओळखले जात असत. याच महाराजांनी मंदिरात सनई चौघडा आणि पाणपोईची व्यवस्था 1645 मध्ये करून दिली होती. यातील हा एक रांजण असून कालांतराने जमिनीत गाडला गेलेला होता.

बाजीराव पडसाळी येथे खोदकाम करताना हा दोन टन वजनाचा दगडी रांजण सापडला होता. आता पुरातत्व विभागाने याची डागडुजी करून सध्या विठ्ठल मंदिराच्या हत्ती दरवाज्यापाशी ठेवला आहे. या भल्या मोठ्या रांजणात 200 लिटर पाणी साठवता येत असून पूर्वीच्या काळी अशा रांजणांचा वापर मंदिरात येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून केला जात होता.

Comments are closed.