मोठी बातमी! अप्पर जिल्हाधिकाऱ्यास एसीबीने रंगेहात पकडले; नवी मुंबईत 22 हजारांची लाच घेताना अटक

नवी मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यात एसीबी कारवाईचा धडाका लावला असून शिपायापासून ते तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकाऱ्यापर्यंतच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक केली आहे. या कारवाईने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरीही लाच घेण्याचं सुरूच असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे एसीबीनेही कारवाई करत धाडसत्र सुरूच ठेवल्याचं आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं. नवी मुंबईतील सिडको येथे थेट अप्पर जिल्हाधिकाऱ्यास (Collector) 22 हजारांची लाच घेताना एसीबी पोलिसांनी अटक केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवी मुंबईत लाचप्रकरणात मोठी कारवाई केली असून सिडकोच्या भूमी व भूमापन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना 22 हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. रामदास जगताप याला सिडको कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आल्याने सिडकोसह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवी मुंबई एसीबीकडून अप्पल जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली असून या कारवाईने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महिला पोलीस अधिकाऱ्यास 28 लाख घेताना अटक

पुणे शहर पोलीस दलातही लाचप्रकरणात एका महिला अधिकाऱ्यास एसीबीने अटक केल्याची घटना 10 दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेनं पोलीस दलात खळबळजनक उडाली. पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police Commissionerate) एका महिला पोलीस अधिकाऱ्यास तब्बल 28 लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. वैशाली तोटेवार असे या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे (API) नाव असून, त्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेत (EOW) कार्यरत होत्या. थेट पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात ही कारवाई झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; आधी रुपाली चाकणकरांची चौकशी, आता नामकर्ण आवारेला अटक

आणखी वाचा

Comments are closed.