मुंबईच्या उपमहापौरांची नाराजीनाट्य कायम; रितू तावडे थेट बोलल्या, ‘नाराजी सोडा, मुंबईकरांसाठी एक

मुंबई :मुंबई उपमहापौरांचा नाराजी नाट्य कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे. महापौरांनी निमंत्रण देऊनही उपमहापौर यांनी आढावा दौऱ्याला दांडी (Ritu Tawde Vs Sanjay Ghadi) मारली. रस्ते विकास काम आणि नालेसफाई आढावा दौऱ्यासाठी बोलवून सुद्धा महापौरांसोबत दौऱ्यासाठी उपमहापौरांची अनुपस्थिती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. नाराजी सोडा आणि मुंबईकरांच्या कामासाठी एकत्र या महापौर रितू तावडे यांनी उपमहापौर संजय घाडी (Ritu Tawde Vs Sanjay Ghadi) यांना एक प्रकारे आवाहन केलं आहे. उपमहापौर संजय घाडी यांना फोन मेसेज करून आपण सोबत विकास काम आणि नालेसफाईचा आढावा घेऊया असा निरोप दिला असताना सुद्धा संजय घाडी महापौरांसोबतच्या दौऱ्याला अनुपस्थित असल्याची माहिती आहे. तर इतर नियोजित कामांमुळे उपमहापौर महापौरांसोबतच्या दौऱ्याला अनुपस्थित असल्याचं महापौर रितू तावडेंनी सांगितलं आहे.(Ritu Tawde Vs Sanjay Ghadi)

Ritu Tawde : उपमहापौरांच्या अनुपस्थितीबाबत महापौर म्हणाल्या…

उपमहापौरांच्या अनुपस्थितीबाबत बोलताना महापौर रितू तावडे म्हणाल्या, माझा त्यांना सल्ला असेल नाराजी दूर करा. मुंबईकरांसाठी काम करा. नाराजी नाट्य आपल्याला सुरू ठेवायचं नाहीये. विरोधकांना जो सल्ला दिला तो सल्ला मी उपमहापौरांना सुद्धा देईल. संजय घाडी यांना मी काल फोन केला त्यांना मी यादी पण पाठवली. मी तुमच्या इथे येत आहे तुम्ही सुद्धा दौऱ्याला या असं सांगितलं, त्यावर ते म्हणाले ताई तुम्ही जाऊन या. मी त्यांना बोलले तुम्हाला आलं पाहिजे. तुम्ही माझी तक्रार केली आहे तर तुम्हाला आता माझ्यासोबत आलं पाहिजे, विनोदाचा भाग आहे. पण ते त्यांच्या कामात बिझी असतील. पुढच्या व्हिजिटला ते माझ्यासोबत येतील. दुसरीकडे कुठे ते व्हिजिटला येतील. मी माझं कर्तव्य त्यांना बोलून पूर्ण केलं आहे. नालेसफाई आणि इतर पाहणी करणे हे आपलं काम आहे.आम्ही सोबत आहोत सोबत बसलेलो आहोत, जरी आम्ही युतीमध्ये एकत्र असलो तरी ते त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करत मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत.

रितू तावडे Vs संजय घाडी : नरजनाट्य म्हणजे नेमके काय?

गेल्या दोन दिवसांमध्ये महापौर रितू तावडे यांनी शहरातील विविध भागात रस्ते, नालेसफाईचे पाहणी दौरे केला. मात्र, मला किंवा शिवसेनेतील (शिंदे) अन्य कोणत्याही नगरसेवकाला त्याचे निमंत्रण मिळाले नाही. मी प्रभाग ५ मधील स्थानिक नगरसेवक असून उपमहापौर देखील आहे. त्यामुळे मला माहिती देणे आवश्यक होते. निमंत्रण नसताना विनाकारण तिथे जाणे माझ्या नियमात आणि संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे मी त्या पाहणी दौऱ्याला गेलो नाही, अशा शब्दात उपमहापौर संजय घाडी यांनी महापौरांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती.

पावसाळ्याच्या तोंडावर आता महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. त्याअंतर्गत रस्ते, नालेसफाईची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. त्या अनुषंगाने महापौर रितू तावडे यांनी परस्पर नालेसफाई पाहणी दौरा केला. त्यांनतर उपमहापौर संजय घाडी यांनीही गुरुवारी स्वतंत्र नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा केल्याने या नाराजीनाट्यामुळे महापालिकेत चर्चांना उधाण आलं. घाडी यांनी माध्यमांसमोर याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, उपमहापौर या नात्याने मला मुंबईकर व माझ्या पक्षाला उत्तर द्यावे लागते. त्यामुळे मी स्वतंत्र पाहणी दौरा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, याबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी किंवा तक्रार व्यक्त करण्याइतपत ही गोष्ट मोठी नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.