IPL 2026: प्लेऑफ्सच्या शर्यतीत सीएसकेला मोठा धक्का! स्टार खेळाडू हंगामाच्या मध्यातच परतला मायदेशी
आयपीएल २०२६ हंगामातून मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. आता चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा एक खेळाडू मायदेशी परतला आहे. फ्रॅंचायजीने बुधवारी (१३ मे) रात्री उशिरा जाहीर केले की, अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटन युकेला परतला आहे.
सीएसकेने सोशल मीडियावर पोस्ट करत ओव्हरटन उजव्या मांडीच्या दुखापतीची तीव्रता तपासण्यासाठी मायदेशी परतल्याची माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, जेमी ओव्हरटनला उजव्या मांडीला दुखापत झाली असून, तो पुढील तपासणी आणि उपचारांसाठी यूकेला परतत आहे. तसेच फ्रॅंचायजीने त्याला आयपीएल २०२६ च्या उर्वरित सामन्यांमधून अधिकृतपणे वगळलेले नाही.
ओव्हरटन संघासाठी या हंगामात चांगली कामगिरी करत होता. त्याने १० सामन्यांत खेळताना १४ विकेट्स घेतल्या आणि १३६ धावाही केल्या आहेत.
सीएसकेचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे ओव्हरटनच्या दुखापतीने त्यात आणखी भर पडली आहे. तसेच बुधवारी (१३ मे) संघाने दुखापतग्रस्त महाराष्ट्राचा अष्टपैलू रामकृष्ण घोषच्या जागी कर्नाटकचा अष्टपैलू मॅकनील नोरोन्हा याला संघात सामील केल्याची घोषणा केली होती.
सीएसकेचे सलामावीर आयुष म्हात्रे आणि
आयपीएल २०२६ मधून बाहेर झालेले सीएसकेचे खेळाडू-
नॅथन एलिस
खलील अहमद
आयुष म्हात्रे
रामकृष्ण घोष
तसेच धोनीने अद्याप एकही सामना खेळलेला नाही, स्पेन्सरने अर्धा हंगाम गमावला, ब्रेविसने पहिल्या तीन सामन्यांना मुकला आणि आता उजव्या मांडीच्या दुखापतीमुळे ओव्हरटन यूकेला परतला.
Comments are closed.