ईपीएफओच्या 7 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज, पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठे बदल होणार, जाणून घ्या

EPFO पूर्ण पैसे काढणे नवी दिल्ली : देशभरातली 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत पीएफ खाते बंद करुन अंतिम म्हणजेच पूर्णपणे रक्कम काढण्यासाठी काही आठवडे किंवा महिन्यांपर्यंत वाच पाहावी लागत होती. काही वेळा कंपनीकडून पडताळणी उशिरा व्हायची तर काही वेळा कागदपत्रं किंवा केवायसीमधील चुकांमुळं क्लेम अडकून राहायचा. मात्र, ईपीएफओकडून ही प्रक्रिया ऑटोमेट केली जाणार आहे म्हणजेच  स्वंयचलित केली जाणार आहे, याचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

तुम्हाला जर कधी नोकरी सोडल्यानंतर तुमचा पीएफ म्हणजेच प्रॉविडंट फंड काढण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागली आहे. तर, तुमच्यासाठी दिलासादायक अपडेच आहे. आता पीएफ काढण्याची प्रक्रिया सोपी आणि वेगवान बनवली जाणार आहे. सध्या पीएफचे फायनल पैसे काढण्यासाठी काही वेळा काही आठवडे किंवा महिने लागायचे. काही वेळा कंपनीकडून पडताळणी वेळेत होत नसायची. तर, कागदपत्रातील त्रुटी आणि केवायसीतील चुकांमुळं क्लेम अडकून राहायचे. मात्र, आता ईपीएफओची प्रक्रिया ऑटोमेट केली जाणार आहे.

सध्या पीएफ खात्यातून अॅडव्हान्स काढताना ऑटो सेटलमेंट सुविधा ज्या प्रकारे मिळते त्याच प्रकारे फायनल पीएफ पैसे काढण्यासाठी वेगवान प्रक्रिया होईल. यामुळं कर्चाऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पोहोचू शकतात आणि वारंवार ऑफिस किंवा एजंटकडे फेऱ्या मारायला लागणार नाहीत.

ईपीएफओचे केंद्रीय भविष्य निधीचे आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी म्हटलं की सरकार फायनल पीएफ काढण्याच्या प्रक्रियेत ऑटो सेटलमेंट सुविधा सुरु करणार आहे.जर एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी बदलली तर त्याच्या पीएफ खात्यात रक्कम ऑटोमेटिक ट्रान्सफर करणे आणि क्लेम ऑटो सेटलमेंट करण्याच्या दिशेनं काम करत आहोत. देशात ईपीएफओचे 7 कोटींहून अधिक सदस्य आहेत.

नोकरी बदलणाऱ्यांना देखील नव्या बदलांमुळं दिलासा मिळणार आहे. पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी वेगळा फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. ईपीएफओच्या प्रयत्नानुसार समजा एखाद्या कर्मचाऱ्यानं नव्या कंपनीत काम सुरु केल्यास त्याचं जुनं खातं नव्या खात्याशी जोडलं जाईल.

सध्याच्या काळात टेक्नोलॉजी, स्टार्टअप आणि खासगी क्षेत्रात काही लोक अनेकदा नोकरी बदलतात. या बदलांचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे. EPFO नं यापूर्वीच ऑनलाइन क्लेम, आधार लिंकिंग आणि सोपी KYC प्रक्रिया सुरु केली आहे. ऑटो-सेटलमेंट आणि ऑटो-ट्रांसफर सारख्या सुविधांमुळं लोकांना वेळेवर पैसे मिळण्यात मदत होईल. मात्र, नवी व्यवस्था कधी लागू होणार हे सांगण्यात आलेलं नाही.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.