जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय
जालना क्राईम न्यूज : जालना जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. 19 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने वार करुन खून करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील रुई गावात ही घटना घडली आहे. राजेश कोरकाने असे मयत तरुणाचे नाव आहे. वातील अज्ञात आरोपीकडून तलवारीने डोक्यावर वार करुन हत्या करण्यात आली आहे. प्रेम संबंधातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे रुई गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा सुरु केला असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यान प्रेम संबंधातून हत्या झाल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
प्रेम संबंधातून हत्या झाल्याचा संशय
जालना जिल्ह्यात एका 19 वर्षीय तरुणाची हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. धारधार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, प्रेम संबंधातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
भिवंडी तालुक्यात धक्कादायक घटना, अज्ञात हल्लेखोरांकडून रात्रपाळी कामावर जाणाऱ्या व्यक्तीची हत्या
भिवंडी तालुक्यातील शेडगाव गावातील रात्रपाळी कामावर जाणाऱ्या व्यक्तीची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना घडली आहे. परेश तोलाराम पाटील वय 40 असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत परेश पाटील हे नेहमी प्रमाणे आपल्या घरून रात्रपाळीसाठी कामावर निघाले होते. त्यांच्या गावाच्या हद्दीतच दबा धरून बसलेल्या अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राच्या सहाय्याने परेश पाटील याच्यावर हल्ला केला. हल्ला एवढा जबर होता की परेश पाटील याचा जागेवरच मृत्यू झाला.याबाबत गणेशपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
Virar Crime : भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या; खदान मालकाचं कृत्य, विरार हादरलं
आणखी वाचा
Comments are closed.