हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला, बीडमध्ये गावगुंडांकडून कीर्तनकारांना अमानुष मारहाण
बीड हल्ला : गेवराई (Georai) गावातील काही व्यक्तींनी कीर्तनकार कैलास आनंदे (Kailas Anande) यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडी रॉड, केबल वायर आणि लाकडी दांड्यांनी करण्यात आलेल्या या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
कीर्तनकार कैलास आनंदे हे स्वानंद सेवा गुरुकुल चालवतात. गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून काही व्यक्तींशी त्यांचा वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी त्यांना आळंदीला जात असताना जातेगाव रोडवर अडवून त्यांना बेदम मारहाण केली.
Beed Harinam Saptah Dispute : हिशोब विचारल्याने वाद चिघळला
अखंड हरिनाम सप्ताहासाठी जमा झालेल्या निधीचा हिशोब मागितल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. या वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाल्याने धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. मारहाणीत कैलास आनंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Beed CCTV Footage : मारहाणीचा व्हिडीओ समोर
या हल्ल्याचे सर्व चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे. मारहाणीदरम्यान हल्लेखोरांनी ‘याचा संतोष देशमुख करून टाका’ असं म्हटल्याचा दावा जखमी कैलास आनंदे यांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा गावातील तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती आनंदे यांनी दिली.
Beed Police Investigation : कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेनंतर आनंदे कुटुंबीय दहशतीत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी आणि बीड पोलिस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Ramdhan Maharaj Death : भजन सुरू असतानाच रामधन महाराज राठोड यांचे निधन
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सुरूमगाव तांडा येथे बंजारा समाजाचे प्रसिद्ध प्रबोधनकार रामधन राठोड (Ramdhan Maharaj Rathod) यांचे भजन सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
प्रवचन आणि भजन कार्यक्रमादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.