दिल्ली कॅपिटल्सच संपूर्ण कोचिंग स्टाफ बस्तान गुंढाळणार? अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यत

आयपीएल 2026 दिल्ली कॅपिटल्स: आयपीएल 2026 हे वर्ष दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) चांगले ठरलेले नाही. अक्षर पटेल (Axar Patel) आणि त्याचा संघ अद्याप अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही, परंतु तिथे पोहोचण्यासाठी त्यांना आता एका चमत्काराचीf गरज पडणार आहे. कारण दिल्लीने आपल्या 12 सामन्यांपैकी सात सामने गमावले आहेत. 10 गुणांसह संघाचा नेट रन रेट -0.093 इतका आहे. परिणामी दोन्ही सामने जिंकूनही संघ केवळ 14 गुणांपर्यंतच पोहोचू शकेल, असे चित्र आहे. दरम्यानदिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals IPL 2026) निराशाजनक कामगिरीनंतर, आगामी हंगामापूर्वी दिल्लीच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, 2027 मध्ये अक्षर पटेल कर्णधारपदी कायम राहण्याची शक्यता कमी आहे.

Axar Patel: कर्णधार म्हणून निराशाच, तर वैयक्तिक कामगिरीही खराब

अक्षरने केवळ कर्णधार म्हणून निराशाच केली नाही, तर त्याची वैयक्तिक कामगिरीही खराब राहिली आहे. 32 वर्षीय अक्षर पटेलने आयपीएल 2026 मध्ये नऊ डावांमध्ये पहिल्या पाचमध्ये फलंदाजी करताना 12.50 च्या सरासरीने 100 धावा केल्या आहेत. यापैकी, त्याने एका डावात 53 धावा केल्या, म्हणजेच इतर आठ डावांमध्ये त्याने एकूण 44 धावा केल्या. अक्षरची गोलंदाजीची कामगिरीही अपेक्षेपेक्षा कमी पडली. त्याने 12 सामन्यांमध्ये 36 षटके गोलंदाजी करून केवळ 10 बळी घेतले. त्याने जास्त धावा दिल्या नसल्या तरी, त्याचा इकॉनॉमी रेट 8.8 होता.

IPL 2026 Delhi Capitals: निराशाजनक कामगिरीनंतर अक्षर पटेलचं कर्णधारपद जाण्याचीही शक्यता

अहवालात म्हटले आहे की, दिल्ली कॅपिटल्सची मालकी 50-50 अशी विभागलेली आहे. जेएसडब्ल्यू आणि जीएमआर आळीपाळीने संघाचे व्यवस्थापन करतात आणि पुढील हंगामात क्रिकेटशी संबंधित सर्व कामकाज पार्थ जिंदाल आणि जेएसडब्ल्यू सांभाळतील. अक्षर पटेलच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, कारण त्याला बहुतेक निर्णयांसाठी हेमांग बदानी आणि वेणुगोपाल राव यांच्यावर अवलंबून राहावे लागले. त्यामुळे, पुढील वर्षी तो दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवेल याची शक्यता खूपच कमी आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका सूत्राने पीटीआयला सांगितले ते“पुढील वर्षी संपूर्ण कोचिंग स्टाफ कायम ठेवला जाईल याची शक्यता कमी आहे.” अक्षर पटेलच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याने अभिषेक पोरेलसारख्या फलंदाजांकडे दुर्लक्ष केले आणि माधव तिवारीसारख्या अष्टपैलू खेळाडूंना पुरेसा वाव दिला नाही. 2027 च्या मेगा लिलावापूर्वी, दिल्ली कॅपिटल्स अक्षर पटेलला संघात कायम ठेवू शकते, परंतु त्याला कर्णधारपदावरून हटवून नवीन कर्णधाराचा शोध घेण्याची दाट शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.