हिंदुस्थानी बॉक्सर्सची २७ पदकांची लयलूट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आशियाई १५ वर्षांखालील बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी युवा बॉक्सर्सनी सुवर्णमुसंडी मारत संपूर्ण आशियाला आपल्या ताकदीची जाणीव करून दिली. हिंदुस्थानने या स्पर्धेत तब्बल २७ पदकांची लयलूट केली. यात ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि १२ कांस्यपदकांचा समावेश असून १५ वर्षांखालील मुलींच्या गटात हिंदुस्थानने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

हिंदुस्थानी मुलींनी या स्पर्धेत सर्वाधिक चमक दाखवत ७ सुवर्ण, २ रौप्य आणि ५ कांस्यपदके जिंकली, तर मुलांनी २ सुवर्ण, ४ रौप्य आणि ७कांस्यपदकांची कमाई केली. ३७ किलो गटात अन्झीने कझाकस्तानच्या नूरझानात बेकनाझारचा ५-० असा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर ४० किलो गटात सोनियाने उझबेकिस्तानच्या बोमिनाखोनवर ५-० अशी एकतर्फी मात करत हिंदुस्थानच्या सुवर्णयात्रेला वेग दिला.

४३ किलो गटात तन्वीने तैपईच्या हान हसी चेनविरुद्ध पहिल्याच फेरीत एबीडी मिळवत सुवर्णपदक जिंकले. ४६ किलो गटात हंशिका अत्रीने कझाकस्तानच्या सब्रिना अदिलखानोव्हा हिच्यावर दुसऱ्या फेरीत विजय मिळवला. त्यानंतर ५८ किलो गटात सुनैनाने उझबेकिस्तानच्या मुकद्दस झोकीरोव्हा हिच्यावर पहिल्याच फेरीत विजय मिळवत हिंदुस्थानच्या पदकसंख्येत भर घातली. ६१ किलो गटात भूमिका हिने कझाकस्तानच्या अयारू फैजुल्लायेव्हा हिच्यावर दुसऱ्या फेरीत विजय सुवर्ण पदक जिंकले. ७० किलो गटात एंजेल हिने खोंझोदाबेगिम बरातोव्हा हिच्यावर ४-१ असा शानदार विजय मिळवत मुलींच्या मोहिमेची सुवर्ण सांगता केली.

Comments are closed.