छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगरातील हर्सूल-सावंगी बायपास परिसरात शेतात पाच वर्षीय गतिमंद बालकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा करत सावत्र बाप आणि जन्मदात्या आईला अटक केली आहे. ओंकार असं मृत मुलाचं नाव असून, नव्या संसारात तो अडसर ठरत असल्यानं त्याला निर्घृण पद्धतीने संपवण्यात आल्याची कबुली आईने पोलिसांसमोर दिली आहे.
या प्रकरणात गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी संतोष सोनाजी ढाळे (वय 34, रा. मोप, जि. वाशिम) आणि त्याची पत्नी पूजा यांना अटक केली आहे. दोघांची कसून चौकशी केल्यानंतर या अमानुष हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले.
Mother Second Marriage Case : आईच्या दुसऱ्या लग्नानंतर बदललं आयुष्य
पूजा हिचे पहिले लग्न संदीप पाडेवाड याच्यासोबत झाले होते. त्यांना शुभांगी (10) आणि ओंकार (5) अशी दोन मुले होती. पती संदीप याला दारूचे व्यसन असल्यानं पाच वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. त्यानंतर पूजाने मुलगी सासूकडे ठेवली, तर गतिमंद मुलगा ओंकारला सोबत घेऊन ती मजुरीसाठी जालना येथे आली होती.
Shiradi Temple Marriage : शिर्डीत प्रेमविवाह, महिनाभरापूर्वी संभाजीनगरात वास्तव्य
सुमारे चार महिन्यांपूर्वी पूजाची ओळख संतोष ढाळे याच्याशी झाली. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी शिर्डी येथील मंदिरात जाऊन लग्न केले. मागील महिन्याभरापासून ते चिकलठाणा येथील सावित्रीनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.
Disabled Child Murder : गतिमंद मुलगा नव्या संसारात ठरला अडसर
ओंकार गतिमंद असल्याने त्याची देखभाल करणे दोघांनाही जड जात होते. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संतोष दारूच्या नशेत वारंवार ओंकारला मारहाण करत असे. अखेर मुलाला कायमचे दूर करण्यासाठी दोघांनी मिळून खुनाचा कट रचला.
Chhatrapati Sambhajinagar Crime Investigation : 24 तासांत गुन्ह्याचा उलगडा
हर्सूल-सावंगी बायपास परिसरातील शेतात मुलाचा मृतदेह फेकून दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुन्हे शाखा आणि एमआयडीसी सिडको पोलिसांनी तांत्रिक तपास आणि चौकशीच्या आधारे अवघ्या 24 तासांत आरोपींना अटक केली.
Child Safety Concern : जन्मदात्या आईच्या सहभागामुळे संताप
या घटनेत स्वतःच्या मुलाच्या हत्येसाठी जन्मदात्या आईनेही साथ दिल्याचे समोर आल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका निरागस आणि गतिमंद मुलाचा नव्या संसारासाठी बळी दिल्याने समाजमन हेलावून गेलं आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.