ना इंटरनेट, ना मोबाइल, ना खिडक्या, सुरक्षित ठिकाण; तरी सेट केलेला पेपर खोलीतून बाहेर कसा आला? ध

नवी दिल्ली: नीट पेपर लिक प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. परिक्षेच्या वेळी इंटरनेट बंद, मोबाईल जप्त, खिडक्या नसलेली खोली आणि बाहेर संपर्क पूर्णपणे बंद असतानाही नीटची (NEET Eaxm Paper Leak) प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली, याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था देशातील नामांकित शिक्षण संस्थांतील अनुभवी प्राध्यापक आणि तज्ज्ञांकडून प्रश्न तयार करून घेते. प्रश्नपत्रिका तयार करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांकडून गोपनीयतेचे प्रतिज्ञापत्र घेतले जाते. कोणत्याही कोचिंग संस्थेशी संबंध नसल्याची आणि कुटुंबातील कोणी परीक्षेला (NEET Eaxm Paper Leak) बसत नसल्याची खात्री देखील करून घेतली जाते. प्रश्नपत्रिका तयार करण्याची अगदी अंतिम प्रक्रिया देखील अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पाडली जाते. प्रश्नपत्रिकेचे भाषांतर, तपासणी आणि अंतिम मांडणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष सुरक्षा केंद्रात ठेवण्यात येते. या ठिकाणी खिडक्या देखील नसतात, इंटरनेट देखील बंद असते, मोबाईल व इतर उपकरणे जप्त केली जातात अशी कार्यरत ठेवली जाते.(NEET Eaxm Paper Leak)

संगणकांचाही बाहेरील संपर्क पूर्णपणे तोडलेला असतो. मग नीट मधील प्रश्न कसे बाहेर आले याबाबत अनेकांना प्रश्न पडला होता, मात्र, तपासात या व्यवस्थेतील काही मानवी दुवेच लिक करण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. “अपेक्षित प्रश्नसंच” किंवा “महत्त्वाचे प्रश्न” या नावाखाली मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कोचिंग क्लासपर्यंत पोहोचवल्याचा संशय आहे. परीक्षेपूर्वी मोठ्या रकमेत असे प्रश्न विकले गेल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. प्रश्नपत्रिकेच्या भाषांतर प्रक्रियेलाही सर्वाधिक संवेदनशील टप्पा मानले जात आहे. या टप्प्यात संबंधित कर्मचाऱ्यांकडे जवळपास संपूर्ण प्रश्नपत्रिका उपलब्ध असते. कमी देखरेख आणि वेळेचा ताण यामुळे हाच धागा सर्वात कमकुवत ठरल्याचे समोर आले आहे.(NEET Eaxm Paper Leak)

NEET Eaxm Paper Leak : स्मरणशक्तीचा मनीषा मांढरेने उपयोग केला अन्…

नीट पेपरफुटीप्रकरणी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान, मनीषा मांढरेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी येत आहेत. मनीषा मांढरेची स्वत:ची स्मरणशक्ती चांगली होती. त्यामुळे याच स्मरणशक्तीचा मनीषा मांढरेने उपयोग केला. मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. मनीषा मांढरेने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. मनीषा मांढरेनेच्या या ट्रिकने सीबीआयही च्रकावली. दरम्यान, नीट पेपेरफुटीतील अन्य आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मनीषा मांढरेचं नाव घेतलं आहे. त्यानंतर सीबीआयने मनीषा मांढरेला अटक केली होती. मनीषा मांढरेविरोधात अन्य कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता.  (Manisha Mandhare NEET Exam Paper Leak)

पेपरमधील सर्व प्रश्न डोक्यात ठेवून मनीषा मांढरेने विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचवले. तसेच गेल्या 25 वर्षांपेक्षा एकच विषय जास्त काळ शिकवल्याने कोणताही प्रश्न लिहून ठेवावा लागला नाही. त्यामुळे मनीषा मांढरेच्या विरोधात सीबीआयला पुरावे शोधावे लागतील. सीबीआयचं तपासपथक लिखित आणि डिजिटल साहित्याच्या मागावर आहे. तपासयंत्रणेकडून पुराव्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.