IPl 2026 – चेन्नईला प्ले ऑफसाठी लास्ट चान्स, गुजरातबरोबर करावे लागणार दोन हात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चेन्नई सुपर किंग्जला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता अखेरची संधी असेल. कारण त्यांचा हा साखळी फेरीतील अखेरचा सामना असेल. गुजरात टायटन्सशी त्यांना दोन हात करावे लागणार आहेत. पण हा सामना जिंकल्यावरही फक्त दैव बलवत्तर असेल तरच त्यांना प्ले ऑफमध्ये संधी मिळू शकते, असे आता समोर आले आहे. त्यामुळे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाची यावेळी कसोटी लागणार आहे.

चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. दुसरीकडे गुजरातचा संघ यापूर्वीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे.

गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि त्याचा सलामीचा साथीदार साई सुदर्शनही चांगल्या लयीत आहे. गुजरातचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खान अनुभवी चेन्नईच्या भक्कम फलंदाजी फळीची परीक्षा घेईल. गिल, जोस बटलर आणि सुदर्शन गुजरातच्या फलंदाजीला आधार देत राहतील. चेन्नईच्या संघाच्या दृष्टीने गायकवाड आणि सॅमसन यांनी त्याच्या सुरुवातीच्या गोलंदाजीचा सामना करून कमपुवत मधल्या फळीचे रक्षण करणे अत्यावश्यक आहे. कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस आणि शिवम दुबे यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत, पण चेन्नईला गोलंदाजीमध्ये जास्त लक्ष देणे भाग असेल.

Comments are closed.