शिवराज मोटेगावकर होता प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचा ब्रँड ॲम्बेसेडर; लेटरहेडमुळे बीडमध्ये खळबळ, आ
शिवराज मोटेगावकर NEET परीक्षेचा पेपर फुटला: देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET-UG) परीक्षा घोटाळ्याचे बीड (Beed) कनेक्शन आता अधिकच गडद होत चालले आहे. या घोटाळ्याचा मास्टरमाइंड पी. व्ही. कुलकर्णी (P V Kulkarni) याचे बीड कनेक्शन समोर आल्यानंतर, आता बीडशी संबंधित आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बीडमधील ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या नामांकित शिक्षक संघटनेचा प्राध्यापक शिवराज मोटेगावकर हा चक्क ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ (Brand Ambassador) होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे मोटेगावकरशी संबंध असलेले बीडमधील अनेक क्लास चालक आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून उघड झाले गुपित
‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’ या संघटनेने 2024 मध्ये ‘नीट’ परीक्षेच्या संदर्भाने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. या निवेदनाच्या अधिकृत लेटरहेडवर प्रा. शिवराज मोटेगावकर याचा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून स्पष्ट उल्लेख आढळून आला आहे. बीड शहरातील शाहूनगर भागात अनेक मोठी शिक्षण संकुले असून, एकाच छताखाली अनेक क्लासेस चालतात. या परिसराला शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. या भागातील क्लास चालकांचे मोटेगावकरसोबत असलेले व्यावसायिक संबंध आता तपास यंत्रणांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: माजी अध्यक्षांचे स्पष्टीकरण; मोटेगावकरांची ग्रुपमधून हकालपट्टी
या खळबळजनक प्रकारावर ‘प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन’चे तत्कालीन राज्याध्यक्ष विजय पवार यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की, “मी यापूर्वीच माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, नीट पेपरफुटी प्रकरणात प्राध्यापक मोटेगावकर याचे नाव आल्याचे समजताच, आम्ही तातडीने कारवाई करत त्याला संघटनेतून आणि संघटनेशी संबंधित सर्व सोशल मीडिया ग्रुप्समधून बाहेर काढले आहे.”
Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: विद्यमान अध्यक्षांची विषयाला बगल
दुसरीकडे, या संघटनेचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत कासार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणावर बोलणे टाळले. “मोटेगावकर हा संघटनेचा ब्रँड ॲम्बेसेडर होता, याबद्दल मला कोणतीही माहिती नाही,” असे सांगत त्यांनी या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.bदरम्यान, नीट घोटाळ्याच्या चौकशीत बीड जिल्ह्यातून नवनवीन आणि वेगवेगळ्या बाबी समोर येऊ लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे आणि शिक्षण वर्तुळात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.
आणखी वाचा
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
आणखी वाचा
Comments are closed.