पहिले NEET पेपर फोडणाऱ्या, विकणाऱ्यांना पकडले; आता थेट विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक, पुण्यात क
मनोज शिरुरे NEET परीक्षा 2026 पेपर लीक: नीट पेपरफुटी प्रकरणातील (NEET Exam 2026 Paper Leak) तपास अधिक गतीने पुढे जात असून, लातूरमधून आणखी एका संशयिताला सीबीआयने अटक केली आहे. लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे (Manoj Shirure) यांना सीबीआयने पुणे येथून काल रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे समजते.
सीबीआयने डॉ. शिरुरे यांना चौकशीसाठी पुणे येथील कार्यालयात बोलावले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी किंवा प्रश्नपत्रिका विकत घेतल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमध्ये डॉ. शिरुरे यांची तब्बल तीन तास चौकशी केली होती. चौकशीदरम्यान त्यांचा मोबाईल फोन तसेच काही महत्त्वाचे दस्तावेजही तपास यंत्रणांनी जप्त केले होते. (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)
विद्यार्थ्यांच्या पालकाला पहिल्यांदाच अटक- (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)
नीट पेपरफुटीप्रकरणी महाराष्ट्रातील आतापर्यंत शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा गुरुनाथ मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काल लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयने अटक केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंतच्या कारवाईतील ही पहिली अटक आहे, जी एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली आहे. आतापर्यंत ज्यांनी नीटचा पेपर फोडला, नीटचा पेपर विकला…यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. परंतु आता नीटचा पेपर स्वत:च्या मुलासाठी खरेदी करणाऱ्या पहिल्या पालकाला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरण आणखी गडद होत आहे.
सीबीआयकडून संपूर्ण नेटवर्कचा तपास- (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)
डॉ. मनोज शिरुरे यांनी पालक म्हणून आपल्या पाल्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक झालेले निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी तसेच आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयकडून या संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू असून, लातूरमधील काही विद्यार्थी, पालक आणि कोचिंग संस्थांच्या संबंधितांचीही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
कोण आहे बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे? (Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak)
लातूर शहरात NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची कारवाई आणखी वेगाने सुरू असून, RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या नेटवर्कमधील संशयितांवर तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून असलेल्या CBI पथकाने काल संध्याकाळी जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालय येथे पोहोचले. हे रुग्णालय बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांचे आहे. फुटलेला NEET पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून त्यांची तब्बल साडेचार तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान काही कागदपत्रे, मोबाईल आणि डिजिटल पुरावे CBI ने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. CBI च्या प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे हे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून ते पेपरफुटीच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.