इराण युद्धाविरोधात अमेरिकी काँग्रेसमध्ये ठराव मंजूर, चार सत्ताधारी खासदारांचे विरोधात मतदान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लष्करी अधिकारांना मर्यादित करणारा प्रस्ताव अखेर अमेरिकन काँग्रेसमध्ये मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव 50-47 मतांनी मंजूर झाला असून चार रिपब्लिकन खासदारांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले. तर तीन रिपब्लिकन खासदार मतदानात सहभागी झाले नाहीत. जर हा प्रस्ताव कायदा बनवला तर ट्रम्प सरकारला इराणविरुद्ध युद्ध सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसची मंजुरी घ्यावी लागेल.

हा ठराव अमेरिकन संसदेत मंजूर झाला असला तरी सध्या सिनेटमध्ये यावर अंतिम मतदान होणे बाकी आहे. नंतर त्याला रिपब्लिकन बहुमताच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजकडून मंजुरी घ्यावी लागेल, मात्र त्यानंतरही ट्रम्प याविरुद्ध व्हेटो करू शकतात. मग तो व्हेटो रद्द करण्यासाठी सिनेट आणि हाऊस दोन्हीमध्ये दोन तृतीयांश बहुमत लागेल.

अमेरिकेने इराणवरील हल्ला तूर्तास थांबवला आहे. कतार, सौदी अरेबिया आणि यूएईने चर्चेला संधी देण्यासाठी हल्ला टाळण्याची विनंती केली होती.

अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे इराणला समुद्रात उभ्या असलेल्या जुन्या टँकरमध्ये तेल साठवावे लागत आहे. पर्शियन आखातात इराणी तेलाने भरलेल्या टँकरची संख्या वेगाने वाढली आहे.

अमेरिकन काँग्रेसची संशोधन संस्था असलेल्या ‘काँग्रेस रिसर्च सर्व्हिस’च्या (सीआरएस) च्या एका अहवालानुसार 28 फेब्रुवारी रोजी इराण युद्धात अमेरिकेची किमान 42 विमाने नष्ट झाली किंवा त्या विमानांचे नुकसान झाले.

Comments are closed.