IPL 2026 – चेन्नईचा गेम संपला! गुजरातचा दणदणीत विजय, CSK ला 89 धावांनी लोळवलं
चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील प्रवास अखेर संपुष्टात आला असून प्लेऑफमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून 89 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने चेन्नई स्पर्धेबाहेर पडली. मुंबई आणि लखनऊनंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारी ती तिसरी टीम ठरली.
या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत दमदार कामगिरी केली. शुभमन गिल (64), साई सुदर्शन (84) आणि जोस बटलर (57) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावत 229 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईची फलंदाजी कोलमडली आणि संघाला 13.4 षटकांत केवळ 140 धावांवर समाधान मानावं लागलं. मोहम्मद सिराज, कगिसो रबाडा आणि राशिद खान यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे गुजरातने एकतर्फी विजय मिळवला.
Comments are closed.