Ratnagiri News – आंबा घाटात रिक्षाचा अपघात, चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गवरील आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या रिक्षाला अघघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश शामराव साळोखे (66) असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे.

रिक्षाचा अपघात नेमका कसा झाला? याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. साखरपा पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने याबाबत तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश साळोखे हे कोल्हापूरचे रहिवासी असून आपल्या रिक्षाने गणपतीपुळे येथे दुकानदारांना पेढ्यांचे बॉक्स घेऊन जात होते. यादरम्यान, आंबा घाटातील गोवरेवाडी बस थांब्याजवळ रिक्षाला अपघात झाला.

अपघाताचे वृत्त समजताच साखरपा दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे,महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रिक्षा चालकाला सहकाऱ्यांच्या मदतीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. साखरपा पोलिसानी पंचनामा करून अपघाताचा तपास करीत आहेत.

Comments are closed.