NEET पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र, 11 पैकी सात आरोपी राज्यातील, अजून एक CBIच्या वेटिंग लिस्टवर

NEET पेपर लीक : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. पुण्यातील मनीषा हवालदार हिला फिजिक्स विषयाची प्रश्नपत्रिका लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची 11 वी अटक आहे. तपासादरम्यान मनीषा हवालदार हिने परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांपर्यंत फिजिक्सची प्रश्नपत्रिका पोहोचवल्याचा आरोप समोर आला आहे.

नीट परीक्षा फुटीप्रकरणात सर्वात मोठं कनेक्शन हे महाराष्ट्रात असल्याचं तपासातून समोर आलं आहे. आतापर्यंत या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी सात आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत. तर याच प्रकरणात पुण्यातील बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांची तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे, मात्र त्यांना CBI ने अधिकृत अटक केलेली नाही. त्यांना जर अटक झाली तर एकट्या महाराष्ट्रातून ती आठवी अटक असेल.

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI ने आतापर्यंत 11 लोकांना केली आहे अटक

महाराष्ट्रातून अटक :

शिवराज मोटेगावकर – CBI कोठडी

प्रल्हाद कुलकर्णी – CBI कोठडी

मनीषा मांडरे – सीबीआय सेल

मनीषा वाघमारे – सीबीआय सेल

मनीषा हवालदार – CBI अटक

शुभम खैरनार – CBI कोठडी

धनंजय लोखंडे – न्यायालयीन कोठडी

दुसऱ्या राज्यातून झालेली अटक :

दिनेश बिवाल – न्यायालयीन कोठडी

मांगीलाल बिवाल – न्यायालयीन कोठडी

विकास बिवाल – न्यायालयीन कोठडी

यश यादव – न्यायालयीन कोठडी

NEET पेपरफुटी प्रकरणी आता सीबीआयकडून मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि पी व्ही  कुलकर्णी या तिघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून तिघांची सीबीआय चौकशी केली जात आहे. या तिघांच्या बँक खात्याची माहिती मिळवण्याचे काम तपास यंत्रणांकडून सुरू असल्याचं कळतंय. सोबतच या तिघांच्या संपर्कात पुण्यातील इतर कोणकोणते व्यक्ती होते याचाही सखोल तपास सीबीआयकडून केला जात आहे. दरम्यान, आरोपी शुभम खैरनारला घेऊन सीबीआय अधिकारी नाशिकला अधिक तपासासाठी रवाना झाले आहेत.

NEET Exam Controversy : तिसऱ्या डॉक्टरची चौकशी सुरू

लातूर शहरात नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता आणखी वेग आला असून, सीबीआयचे पथक आता तिसऱ्या डॉक्टरांच्या चौकशीसाठी दाखल झाले आहे. जुना औसा रोड परिसरातील एका BAMS डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआय अधिकारी पोहोचले. संबंधित डॉक्टरांची कागदपत्रे आणि संपर्कांची पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी लातूरमधील दोन डॉक्टरांची चौकशी करण्यात आली होती. त्या चौकशीनंतर तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

CBI Investigation : डॉक्टरांसोबत हायप्रोफाईल पालकही सीबीआयच्या रडारवर

नीट पेपर लीक प्रकरणी महाराष्ट्र हेच पेपरफुटीचं केंद्र असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे पेपरफुटीच्या मास्टरमाईंड सोबतच काही हायप्रोफाल पालकही सीबीआयच्या राडारवर आले आहेत. सीबीआयच्या आजवरच्या तपात काही धनाढ्य पालकांनी त्यांच्या मुलांसाठी हे पेपर खरेदी केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे एजन्सी आता अशा सर्व पालकांची यादी तयार करत आहे, ज्यांच्या बँक खात्यांतून शिवराज मोटेगांवकर, पी. व्ही. कुलकर्णी किंवा त्यांची सहकारी मनीषा वाघमारे यांच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते.

आतापर्यंतच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे फुटलेल्या पेपरचा लाभ मिळालेल्या पालकांनी हा पेपर आणखीही काही लोकांना विकला होता. त्यामुळे पेपर किती लोकांपर्यंत पोहोचला, हे सध्या शोधणे कठीण झालं आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.