MS धोनी खेळणार खेळणार म्हणत सगळ्यांना गंडवलं; चेन्नईचा स्कॅम अन् लोकांच्या शिव्या, आता दिग्गज क
एमएस धोनी घोटाळा आयपीएल 2026 : पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) आयपीएल 2026 मधील प्रवास अत्यंत निराशाजनक पद्धतीने संपला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) चेन्नईचा 89 धावांनी धुव्वा उडवला. हा चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल इतिहासातील लाजिरवाणा पराभव ठरला आहे. या पराभवासह चेन्नईचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले असून ते या स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडले आहेत.
दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनावर जोरदार निशाणा साधला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड, प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि फ्रँचायझी व्यवस्थापनाने संपूर्ण हंगामभर एम एस धोनी यांच्या पुनरागमनाबाबत चाहत्यांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला.
एमएस धोनी स्कॅमची सध्या जोरदार चर्चेत
सोशल मीडियावर ‘एमएस धोनी स्कॅम’ हा विषय सध्या जोरदार चर्चेत आहे. धोनीच्या पुनरागमनाचे वारंवार संकेत देत चाहत्यांच्या भावना भडकवल्या गेल्या, असा आरोप या चर्चेत केला जात आहे. श्रीकांत यांनीही याच मुद्द्यावर बोलताना सांगितले की, व्यवस्थापन सतत धोनीच्या ट्रेनिंगचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत राहिले, ज्यामुळे चाहत्यांना तो पुन्हा मैदानात उतरणार असल्याची आशा कायम ठेवली गेली.
“ते नेटवर त्याचा काही व्हिडिओ घेऊन चाहत्यांना मूर्ख बनवतील” – क्रिस श्रीकांतने एमएस धोनीच्या चाहत्यांसह घोटाळ्यावर CSK ची निंदा केली 👀🤯
क्रिस श्रीकांत म्हणाला 🗣️,
“तो पुढच्या सामन्यासाठी तयार आहे असे ते सांगत राहिले. त्यानंतर, ते नेटवर त्याचे काही व्हिडिओ दाखवून चाहत्यांना मूर्ख बनवतील. मग त्यांनी ठेवले… pic.twitter.com/seArgs5hEN
— क्रिकेट सेंट्रल (@CricketCentrl) 22 मे 2026
दिग्गजाच्या आरोपांनी क्रिकेटविश्व हादरलं
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना श्रीकांत म्हणाले, “हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीच्या पायाला दुखापत असल्याचे सांगण्यात आले आणि तो लवकरच परत येईल, अशी माहिती देण्यात आली. ऋतुराज गायकवाड आणि स्टीफन फ्लेमिंग देखील प्रत्येक वेळी एकच गोष्ट सांगत होते की, धोनी पुढच्या सामन्यात उपलब्ध असू शकतो. प्रत्येक सामन्याआधी ट्रेनिंगचा व्हिडिओ टाकला जायचा, ज्यामुळे चाहत्यांना तो फिट असल्याचे वाटत होते.”
🚨 CSK मॅनेजमेंट आणि CSK च्या पॅथेटिक परफॉर्मन्सवर क्रिस श्रीकांत संतापला 🚨
क्रिस श्रीकांत म्हणाले 🗣️,
“माझ्या मते, चेन्नई सुपर किंग्जची या वर्षी पूर्णपणे चुकीची संघ निवड झाली. फक्त तरुण खेळाडूंसह तुम्ही कधीही चॅम्पियन बनू शकत नाही. चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी तुम्हाला… pic.twitter.com/JN0HUgcygN
— भारतीय स्पोर्ट्स नेटवर्क (@IS_Netwrk29) 22 मे 2026
गेल्या गुरुवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला. त्या सामन्यानंतर ऋतुराज गायकवाड यांना धोनीच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “धोनी पुढच्या हंगामात खेळणार की नाही, हे पुढच्या वर्षीच कळेल,” असे उत्तर दिले. या वक्तव्यावरही श्रीकांत संतापले.
सीएसके व्यवस्थापनावर टीका करताना श्रीकांत म्हणाले, “जर धोनी संपूर्ण हंगाम खेळणार नव्हते, तर ते आधीच स्पष्ट सांगायला हवे होते. चाहत्यांना खोटी आशा दाखवणे बंद केले पाहिजे. सत्य आधी सांगितले असते, तर चाहते मानसिकदृष्ट्या त्यासाठी तयार झाले असते.”
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.