…तर रणजी ट्रॉफीच बंद करा! आकिब नबीला संधी न दिल्याबद्दल दिलीप वेंगसरकर नाराज
हिंदुस्थान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अजित आगरकर यांच्या निवड समितीवर निशाणा साधला आहे. गेल्या वर्षात चमकदार कामगिरी करणाऱ्या आकिब नबीला हिंदुस्थानी संघात स्थान न दिल्याबद्दल वेंगसरकर हे नाराज असल्याचे पाहायला मिळाले. जर रणजी ट्रॉफी ही जर निवडीसाठी निकष नसेल तर ती बंदच करा, असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना 6 ते 10 जूनदरम्यान खेळवला जाईल. मात्र रणजी ट्रॉफीमध्ये चमकलेल्या जम्मू आणि कश्मीरचा मध्यमगती गोलंदाज आकिब नबीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.
आकिब नबीची कामगिरी…
आकिब नबीने 2025-26 च्या रणजी ट्रॉफी हंगामात संपूर्ण स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केली. नबीने 60 विकेट घेऊन सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा विक्रम रचला होता.. जम्मू आणि कश्मीरला पहिले रणजी ट्रॉफी विजेतेपद मिळवून देण्यात नबीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे वेंगसरकर नबीला वगळल्यामुळे तीव्र नाराज आहेत.
दिलीप वेंगसरकर संदेष्ट्याबद्दल काय म्हणाले…
वेंगसरकर यांनी सांगितले की, ‘निवड समितीने नबीकडे दुर्लक्ष करणे हे पूर्णपणे अनाकलनीय आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 60 विकेट घेतल्या. पण तरीही जर त्याला हिंदुस्थानी संघात स्थान मिळत नसेल तर रणजी ट्रॉफी बंद करायला हवी, असे मला वाटते. नबीने त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि इतर कोणाही आधी त्याला संघात स्थान मिळायला हवं होतं. जर देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी हा निकष नसेल तर बीसीसीआयने हे थांबवलं पाहिजे.’
होऊ नका विकेट घेण्यात सातत्य दाखवलं…
ते पुढे म्हणाले की, ‘तुम्ही गोलंदाजाची निवड त्याच्या विकेट घेण्याच्या क्षमतेवर करता. तो तासाला 130 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करत असेल, पण महत्त्वाचं आहे ते त्याची विकेट घेण्याची क्षमता. या मुलाने विकेट्स मिळवण्यात कमालीचे सातत्य दाखवलं आहे. त्याला घडवण्यासाठी हीच योग्य वेळ होती. खेळाडू फॉर्मात असतानाच त्याला संधी दिली पाहिजे. त्याचा आत्मविश्वास, फिटनेस किंवा त्याची खेळण्याची इच्छा कमी होण्याची वाट निवड समितीने पाहू नये.’
Comments are closed.