अर्थवृत्त – सरकार सेंट्रल बँकेतील हिस्सा विकणार! ऑफर फॉर सेलद्वारे 2455 कोटी उभारणार

सत्तेत आल्यापासून देशातील सरकारी मालमत्ता विकायचा सपाटा लावणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारने आता सेंट्रल बँक ऑफ इंडियातील आपला आठ टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. ऑफर फॉर सेलद्वारे सरकार प्रति शेअर 31 रुपयांचा फ्लोर शेअर निश्चित केला असून यातून सरकार तब्बल 2 हजार 455 कोटी रुपये उभारणार आहे. सरकार बँकेतील हिस्सा विकणार असल्याने शुक्रवारी सेंट्रल बँकेच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली.

डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अॅण्ड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटद्वारे जारी केलेल्या सूचनेनुसार बँकेचे कर्मचारी या इश्यूसाठी 25 मे 2026 रोजी सकाळी सव्वा नऊ ते साडेतीन वाजेपर्यंत आपली बोली लावू शकतील. बेस ऑफरमध्ये 4 टक्के हिस्सा, मागणी राहिल्यास 4 टक्के अतिरिक्त विक्रीचा पर्याय उपलब्ध केला जाईल. बेस ऑफरअंतर्गत सरकार 4 टक्के म्हणजेच 36,20,56,051 इक्विटी शेअर्सची विक्री करेल. गुंतवणूकदारांची मागणी चांगली राहिल्यास सरकार तेवढेच आणखी शेअर्सची विक्री करेल. सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सरकारची 89.27 टक्के हिस्सेदारी आहे.

‘सर्व्हिस अॅश्युर’

आयसीआयसीआय लोम्बार्डने ‘आयएल स्मार्ट असिस्ट’ अंतर्गत ‘सर्व्हिस अॅश्युर’ या सुविधेचा प्रारंभ केला. यात गाडी नादुरुस्त किंवा अपघात झाल्यास कंपनी आठ मेट्रो शहरांमधील ग्राहकांपर्यंत 30 मिनिटांच्या आत पोहोचेल.

डेलचा नवा लॅपटॉप

डेल टेक्नॉलॉजीजकडून एआय-पावर्ड डेल 15 हिंदुस्थानात लाँच करण्यात आला आहे. डेल 15ची सुरुवातीची किंमत रु. 69,699 असून विविध ऑफर्ससह हा डिव्हाईस डेल डॉट कॉम, रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.

जनजागृती उपक्रम

1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या आयकर अधिनियमच्या तरतुदींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बॉम्बे चार्टर्ड अकाऊंटंट्स सोसायटीने आयकर आयुक्त 4, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रारंभ’ या उपक्रमांतर्गत सत्र आयोजित केले.

पैसाबाजारची मोहीम

पैसाबाजारने ‘क्रेडिट प्रीमियर लीग’साठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे. यामध्ये माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आहे. सीपीएल हा पैसाबाजारचा एक विशेष उपक्रम आहे. त्याचा उद्देश उत्तम क्रेडिट हेल्थ ग्राहकांना ओळखणे आणि त्यांना पुरस्कृत करणे आहे.

टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची भागीदारी

टाटा रियल्टी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि सेल्सपर्ह्सने टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी भागीदारी केली. यावेळी टाटाचे गिरीश हडकर, सेल्सफोर्सच्या अरुंधती भट्टाचार्य आणि सेल्सफोर्सच्या एमडी मनकिरण चौहान उपस्थित होते. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त आठ तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते.

महाराजाची पानडी आणि हिना अगरबत्ती बाजारात

महाराजा अगरबत्तीची पानडी आणि हिना प्युअर ब्रँडची अगरबत्ती बाजारात आली आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. तसेच केसरिया उद, केसरिया चंदन, मिस्टिक रोझस टेम्पल ब्लिस, रॉयल उद, हीना, पानडी, सुखद सँडल, पल्सर,बेला, कॉन्फिडंट, ड्रीम, लव्हेंडर, सँडलवुड, स्वामी, ग्रीन मस्क, कश्मिरी लव्हेंडर, अंगारे उद, कस्तुरी आणि अनमोल अशा प्रकारातील उत्तम अशा विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्त्या महाराजा अगरबत्ती, रघुनाथ निवास, डी. व्ही. देशपांडे मार्ग, शिवाजी पार्क रोड क्रमांक 4, दादर येथे उपलब्ध आहे. 8369185071 वर संपर्क साधा.

करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात

बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सने प्युअर ब्रँडची नवी अगरबत्ती हरि पानडी आणि वीरा मसाला अगरबत्ती बाजारात आणली आहे. या अगरबत्त्या नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केल्या आहेत. तसेच या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अगरबत्त्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
संपर्क – 9343834805.

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सची नवी शाखा

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या देशव्यापी वितरण जाळ्याचा विस्तार करण्याच्या योजनेचा भाग म्हणून मुंबईतील दादरमध्ये नवी शाखा सुरू करून महाराष्ट्रात अजून एक पुढचे पाऊल उचलले आहे. यावेळी आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ पंकज गाडगीळ उपस्थित होते. या शाखांची एकूण संख्या आता 32 झाली आहे.

अॅरोकेम रतलामचा अल्कोहॉल फ्री डिओ

अॅरोकेम रतलाम प्रा. लि. ने सेवेन सिज अल्कोहोल फ्री डिओ नवीन पॅकमध्ये बाजारात आणले आहे. या डिओचा सुगंध अत्यंत उत्तेजक, दर्जेदार आणि टवटवीत करणारा आहे. हा डिओ अत्यंत मनमोहक आहे. या डिओच्या 200 मिलीची किंमत 200 रुपये आहे. इतर प्रकारचे उपलब्ध असलेले अल्कोहोल फ्री डिओ बाजारात उपलब्ध आहेत.
संपर्क – 07412-236226

Comments are closed.