Ratnagiri News – चिपळूणमध्ये एचडीएफसी बँकेचा कर्मचारी बेपत्ता, चार पानी पत्र लिहून चौघांना जबाबदार धरले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एचडीएफसी बँकेच्या चिपळूण शाखेत कार्यरत असलेला 33 वर्षीय तरुण कर्मचारी शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मुकुंद मुरलीधर पालांडे असे त्यांचे नाव असून ते अलोरे गावचे रहिवासी आहेत.

पालांडे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी चिपळूण पोलिस निरीक्षक यांना चार पानी पत्र लिहिले आहे. या पत्रात एचडीएफसी चिपळूण शाखेतील चार जणांची आपल्या आत्महत्येस जबाबदार म्हणून नावे लिहिली आहेत. दोन दिवसांपूर्वी चिपळूण विरेश्वर तलाव येथे त्याला काही तरुणांनी मारहाण केली होती. ओळखीच्या पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविण्याचा उल्लेख त्या पत्रात केला आहे. आपणास मानसिक त्रास आणि ब्लॅकमेल केल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने म्हटले आहे.

शिरगाव पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी शुक्रवारी रात्री साडे आठपर्यंत कोळकेवाडी येथील कॅनॉल नजीक त्याची दुचाकी आढळली. त्या परिसरात त्याचा शोध घेतला. शनिवारी सकाळी चिपळूणहून बोट आणून शोधमोहीम सुरू आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही.

Comments are closed.