नीट पेपरफुटी प्रकरण! CBI चे पथक मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये दाखल, नातेवाईकांची चौकशी सुरु

NEET पेपर लीक बातम्या लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आला आहे. आरोपी असलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून संबंधित व्यक्तीची तपास यंत्रणेकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

पुन्हा एकदा सी बी आय चे पथक मोटेगावकर यांच्या खाजगी क्लासेसमध्ये दाखल

या प्रकरणाच्या तपासासाठी पुन्हा एकदा सी बी आय चे पथक मोटेगावकर यांच्या खाजगी क्लासेसमध्ये दाखल झाले आहे. तपास यंत्रणेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी तसेच आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात असल्याचे समजते. नातेवाईकांपैकी कोणाचा पेपर फुटी मध्ये सहभाग होता का? याबाबतही तपास सुरू आहे. मोटेगावकर यांच्या नातेवाईकांचा आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग होता का? तसेच पैशांची गुंतवणूक आणि व्यवहारांची साखळी काय होती याचा तपास सीबीआयकडून केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या कारवाईमुळे नीट पेपरफुटी प्रकरणातील तपास आणखी व्यापक होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पेपर फोडण्यात मोटेगावकरचा थेट सहभाग, 8 दिवस अगोदरच प्रश्नपत्रिका मिळवल्याचं सीबीआयच्या तपासातून समोर

देशभरात खळबळ उडवून देणार्‍या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने लातूरमधील आरसीसी क्लासेसचे सर्वेसर्वा शिवराज मोटेगावकर  यास अटक केली आहे. नीट पेपर फोडण्यात मोटेगावकरचा थेट सहभाग असून त्याने 8 दिवस अगोदरच प्रश्नपत्रिका मिळवल्याचं सीबीआयच्या तपासातून समोर आलं आहे. त्यानंतर, मोटेगावकरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसोबतचा संवाद असेल किंवा आपल्या क्लासेसमध्ये जे शिकवलं तेच परीक्षेत आल्याचं सांगणारा व्हिडिओ असेल. आता, मोटेगावकरचा एक अंधश्रद्धा पसरवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर, अंधश्रद्धा निर्मुलन समितीने प्रतिक्रिया देत, पोलीस तपासाची मागणी केलीय.

सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये नीट पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे (NEET Paper Leak Case) मिळाले आहेत. त्यामुळे सीबीआयच्या म्हणण्यानूसार, यापुढील आरोपींना अटक झाल्यानंतर नीट पेपरलीक प्रकरण आणखी व्यापक वळण घेणार आहे. तसेच नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र म्हणून समोर आले असून या प्रकरणात हायप्रोफाईल पालक रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयच्या तपासातून काही नातेवाईकांनी नीटचा पेपर पुढे इतर लोकांनाही विकला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप किती विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केला होता, हे सीबीआयला निश्चित करता आलेले नाही. यामुळेच पेपर किती लोकांपर्यंत पोहोचला, हे सध्या शोधणे कठीण झाले आहे. (NEET Paper Leak Case)

आणखी वाचा

Comments are closed.